सामाजिक कार्य करत असलेल्या शिक्षकांचा व अभियंत्यांचा गौरव
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
लायन्स क्लब ऑफ पंढरपूरच्या वतीने शिक्षकदिन व अभियंता दिन पंढरपूरमध्ये कवठेकर प्रशाला येथे साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी शिक्षण क्षेत्रामध्ये व अभियंता क्षेत्रामध्ये काम करत असताना इतरही सामाजिक कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी श्री शांताराम कुलकर्णी, श्री प्रकाश डबीर,श्री सदानंद डिंगरे,श्री भारत गदगे, श्री दत्तात्रय तरळगट्टी, श्री अनिल धट, श्री सुरेश शिंदे,श्री नंदकुमार कुलकर्णी,श्रीमती अंजली बारसावडे, श्रीमती सविता पिंपळनेरकर, सौ सिमा चिंचोळकर यांचा सन्मान करण्यात आला तसेच अभियंता दिनाचे औचित्य साधून स्वेरी कॉलेज समूहाचे संस्थापक विश्वस्त श्री दादासाहेब रोंगे,श्री मोहन डी. पाटील,श्री कन्हैया उत्पात व श्री सतीश शेटे यांचा सन्मान करण्यात आला.
शिक्षक व अभियंता यांचे कार्य समाजाच्या विकासासाठी,नवीन पिढी घडवण्यासाठी,नवनवीन तंत्रज्ञान निर्मितीसाठी व त्याचा उपयोग करण्यासाठी खूप महत्त्वाचे असल्याचे लायन्स अध्यक्ष श्री विवेक परदेशी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण व्हावा, एक जिद्द निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम कवठेकर प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसमोर आयोजित केला असल्याचे श्री परदेशी यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांचा सन्मान करताना मन गहिवरून आले असल्याचे डॉ ऋजुता उत्पात यांनी सांगितले तर उत्कृष्ट सेवा देत असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो असे मनोगत डॉ अश्विनी परदेशी यांनी सदर प्रसंगी व्यक्त केले. उपस्थित विद्यार्थ्यांना लायन्स संस्था व डॉ उत्पात यांच्या वतीने पौष्टिक खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्याअध्यक्ष स्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बारसावडे मॅडम होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नंदकुमार कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ ऋजुता उत्पात यांनी मानले. या कार्यक्रमास श्री विवेक परदेशी,श्री राजीव कटेकर, श्री राजीव गुप्ता, डॉ ऋजुता उत्पात, डॉ अश्विनी परदेशी,सौ सरिता गुप्ता,सौ शोभा गुप्ता, सुरेखाताई कुलकर्णी, सौ सीमा गुप्ता आणि बहुसंख्य शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा