लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येणार - पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शिवशाही वृत्तसेवा औरंगाबाद
लम्पीची साथ आटोक्यात आणण्यासाठी आता जनावरांनाही क्वारंटाईन (विलगीकरण ) करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. जि.प. च्या प्रत्येक गटात एक क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी त्यांची विमानतळावर भेट घेऊन या संदर्भात मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरील आदेश दिले. दरम्यान लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी सांगितले.
पशुसंवर्धन मंत्री विखे - पाटील म्हणाले की , उपचारासाठी आवश्यक औषधांची ' ड्रग्ज बॅग ' तयार करण्यात येणार आहे. या रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.
मृत जनावरांसाठी अशी असेल मदतगाय. रू.३० हजारबैल. रू.२५ हजारवासरू. रु १६ हजारम्हशी संदर्भातील निर्णय लवकरच घेणार
खाजगी पशुवैद्यकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात, विद्यार्थ्यांना निवास व अनुषंगिक व्यवस्था आणि प्रती लसीकरण तीन रुपये प्रमाणे मानधन सुरू करावे, जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर भेटी देऊन लम्पी बाबत गैरसमज दूर करावे, असे निर्देशही विखे - पाटील यांनी दिले. म्हशीवर या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत नसल्याने म्हशीच्या संदर्भातील केंद्र सरकारी मंजुरी घेऊन बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा