प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा मुंबई
राज्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाने बहुतांशी धरणे भरली असून त्यामधून विसर्ग सुरू असल्याने नद्यांनाही पूर आला आहे.
गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह , ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्याला झोडपून काढले असून हवामान खात्याने आणखीन मुसळधार पावसाचे ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोरंबे धरण 98 टक्के भरले आहे.
रायगड जिल्ह्यातील हेटवणे धरण भरले आहे. शुक्रवारी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. बारवी नदीवरील पूलही पाण्याखाली आल्याने धरणा मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. उल्हास नदी ही दुथडी वाहत असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडले आहेत.
नाशिक शहर व परिसरात गुरुवारपासून पावसाने जोर धरला असून, गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून नदीचे पाणी असे खळाळत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा