पायवाटेत चप्पल आढळल्याने विहीर उपसली, पुढे काय दिसलं?
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर
उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे गावच्या सरपंच भाभी अशी ओळख असलेल्या महिला सरपंच जैतून शेख यांच्या कुटुंबाची शेतीवरच गुजराण होती . शेतीच्या निमित्ताने गावातील सर्वांशी व्यवहार चालतो. त्यामुळे सरपंच कुटुंबाचे गावातील सर्वांशी चांगले संबंध, उस्मान यांच्या पत्नी जैतुनबी यांना गावातील लोक सरपंच भाभी म्हणून ओळखतात. पण बुधवार पासून सरपंच भाभी गायब झाल्याने गावातखळबळ उडाली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे गावच्या वय 65 वर्षीय महिला सरपंच जैतून शेख या बुधवारपासून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे मिसिंगची फिर्याद त्यांचे पुत्र सरदार शेख यांनी दिली आहे. बुधवारी 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्या शेळ्या चारायला जाते, असे सांगून त्या शेतात गेल्या होत्या. शेळ्या परत आल्या पण सरपंच जैतूनबी शेख या घरी परत न आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
जैतून शेख यांच्या कुटुंबातील दोन्ही मुलं, पती, सुना, नातवंडांनी सर्व ठिकाणी शोध घेतला. पण त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. ग्रामस्थांनी देखील आजूबाजूच्या शेतात व इतर ठिकाणी सरपंच जैतूनबी शेख यांची माहिती घेतली. अखेर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यात आली. कवठे गावात बुधवारी सरपंच भाभी अचानक बेपत्ता झाल्याने संपूर्ण गावच सुन्न झाले आहे.
शिवशाही न्यूज चॅनल पहा
चॅनल सबस्क्राईब करा
गावालगत व शेताजवळच्या सर्व विहिरी, पाहुणे, इतर गावे व सभोवताल गावकऱ्यांनी पिंजून काढला आहे. दरम्यान शेताच्या रस्त्याच्या बाजूच्या पाऊलवाटेला एक चप्पल आढळल्याने ग्रामस्थांनी जवळच्या विहिरीचे संपूर्ण पाणी उपसले आहे. पण शोध लागला नसल्याचे मुलगा सरदारने सांगितले.
सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पीएसआय सचिन मंद्रुपकर हे आपल्या फौजफाटा घेऊन गावात दाखल झाले. ज्या शेतात सरपंच भाभी शेळ्या राखायला गेल्या होत्या त्याठिकाणी जाऊन शोध सुरू केला. गावातील प्रत्येक नागरिकाचा कसून तपास केला. सापडलेल्या एका चपलेवरून डॉग स्क्वाडला पाचारण केले. त्याला चपलेचा वास दाखवून शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण डॉग शेतात काही अंतरावर जाऊन घुटमळले.
जैतून शेख यांचे पती उस्मान शेख, मुलगा सरदार शेख यांची देखील विचारपूस केली. राजकिय लोकांसोबत भांडण किंवा तक्रार झाली होती का, याची सविस्तर माहिती घेतली. पण पोलिसांच्या हाती अजूनही धागा लागला नाही. पण लवकरच सर्व माहिती समोर येईल अशीही चर्चा पोलीस अधिकारी करत होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा