मध्यरात्री भर पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उतरले गाडीतून
शिवशाही वृत्तसेवा मुंबई
पैठणची सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानाने मुंबईला पोहोचले. विमानतळावरून मध्यरात्री साडेबारा वाजता ते घरी जात असताना, पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले येथे एका तरुणाच्या गाडीला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली गाडी थांबवली आणि भर पावसात खाली उतरून त्या तरुणाची आस्थेने विचारपूस केली.
स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाहताच त्या तरुणाला अश्रू अनावर होऊन, तो ढसाढसा रडू लागला. तेव्हा "आपला जीव वाचला हे महत्त्वाचे, गाडी काय आपण नंतरही घेऊ", असे समजूतीच्या सुरात सांगितल्यावर, त्या तरुणाने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांना, त्या तरुणाला सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. विक्रांत शिंदे असे त्या तरुणाचे नाव आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा