एकीच्या आत्महत्येचे बातमी समजतात दुसरीने ही उचलले टोकाचे पाऊल
शिवशाही वृत्तसेवा पुणे
हडपसर परिसरात खळबळ
पुण्याच्या हडपसर येथील शेवाळवाडी येथे दोन तरुणींनी आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर, तिला रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना, तिच्या मैत्रिणीने पाचव्या मजल्यावरून उडी मारून, आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सारिका हरिश्चंद्र भागवत आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड, अशी या 19 वर्षीय मैत्रिणींची नावे आहेत. हा प्रकार शेवाळवाडी येथील, जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील, क्रिस्टल सोसायटीत, मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
पाठोपाठ दोन मैत्रिणींची आत्महत्या
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सारिका आणि आकांक्षा या दोन्ही बाल मैत्रिणी होत्या. सारिका हिने आपल्या राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सारिकाची मैत्रीण आकांक्षा ही देखील तिथे पोहोचली. सारिका हिचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन जाण्यात येणार होता. त्याचवेळी आकांक्षा त्याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गेली, आणि तेथून खाली उडी मारली. सारिकाला नेण्यासाठी आलेल्या ॲम्बुलन्स जवळच ती पडली. उंचावरून पडल्याने, तिचा जागीच मृत्यू झाला.
आत्महत्येचे कारण समजले नाही
सारिका हिने आत्महत्या का केली ? व तिने आत्महत्या केल्याचे समजतात आकांक्षा तिनेही आपला जीवही संपवला यामागे नेमके कारण काय ? हे अद्याप समजलेले नाही. हडपसर पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा