ठाकरे,शिंदे,फडणवीस,यांची प्रतिष्ठा लागणार पणाला
![]() |
rutuja latake & muraji patel |
शिवशाही विशेष वृत्त ( सचिन कुलकर्णी, संपादक )
अंधेरी पूर्व मतदार संघात पोटनिवडणूक
अंधेरी पूर्व मतदार संघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. 11 मे रोजी आमदार रमेश लटके यांचे निधन झाले होते. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली असल्याने, ही पोटनिवडणूक लागल्यावर, शिंदे गट आणि उद्धव गट, असा सामना या पोट निवडणुकीत दिसेल, असा सगळ्यांचाच अंदाज होता. ही जागा शिंदे गट लढवणार असल्याचेही बोलले जात होते. मात्र शिंदे गटाच्या या जागेवर आता भाजपाने आपला उमेदवार दिल्याने, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
सेनेच्या ॠतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात लढत
उद्धव ठाकरे यांनी या जागेवर दिवंगत आमदार रमेश लाटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनाच उमेदवारी दिली आहे. तर मूरजी पटेल हे भाजपचे उमेदवार असतील. मूरजी पटेल हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत. 2019 साली त्यांनी शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांच्या विरोधात अपक्ष लढत दिली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. मात्र आता भाजपाने त्यांना उमेदवारी दिली आहे.
ठाकरे, फडणवीस, आणि शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला
रमेश लटके ते 52 वर्षे सक्रिय राजकारणात होते त्यांची राजकीय वाटचाल मोठी विलक्षण होती ती अंधेरी पूर्व भागातील शिवसेनेचा विश्वासू माणूस म्हणून परिचित होते त्यांची राजकीय कारकीर्द जवळून पाहिलेल्या त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ही पोट निवडणूक शिवसेनेकडून लढवत असून त्यांच्यासमोर भाजपाच्या मुर्जी पटेल यांचे मोठे आव्हान असणार आहे महाराष्ट्रात सत्तांतर नाट्यानंतर होणारी ही पोटनिवडणूक उद्धव ठाकरे गट, शिंदे गट व भाजपा या तिन्ही पक्षांसाठी महत्त्वाचे असणार आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा