एकवीस वर्षीय तरुण गेला वाहून, पोलिसांकडून शोध कार्य सुरू
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथील बंधाऱ्यावरून एका 21 वर्षे युवकाने पुराच्या पाण्यात उडी मारली असता तो वाहून गेला असल्याची माहिती समोर आली आहे. सायंकाळी 5:30 च्या सुमारास ही घटना घडली असून दारूच्या नशेत त्यांने हे कृत्य केल्याचे समजते.
धोंडेवाडी येथील युवक गजेंद्र उर्फ सज्जन संतोष गायकवाड आणि त्याचे काका भारत रामचंद्र गायकवाड हे दोघे करकंब येथे पाहुण्यांकडे गेले होते. परतीच्या वाटेत ते पिराची कुरोली येथे आले असता सज्जन यांने दारूच्या नशेत बंधाऱ्यावरून वाहत्या पाण्यात उडी मारली. पाण्याचा वेग जास्त असल्याने तो वाहून गेला. ही माहिती कळताच पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि मासेमारी करणारे लोक तसेच स्थानिक नागरिक यांच्या मदतीने शोध कार्य सुरू केले आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा