तिसंगी शिवारातील अजिंक्यतारा हॉटेलवर पंढरपूर ग्रामीण पोलिसांचा छापा
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील तिसंगी शिवारातील अजिंक्यतारा हॉटेलवर पंढरपूर ग्रामीण पोलीसांनी छापा टाकून एक लाख 8३ हजार ७८० रुपये किमतीचा अवैध दारू साठा जप्त केला आहे. या कारवाईत हॉटेल चालक बंडू भारत पाटील याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील तिसंगी शिवारात असलेल्या अजिंक्यतारा हॉटेलमध्ये देशी विदेशी दारूचा अवैध साठा असल्याची माहिती, दिनांक ११ रोजी खबऱ्या मार्फत पोलिसांना मिळाली.
पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तातडीने दखल घेऊन या हॉटेलवर छापा टाकला. तेव्हा हॉटेलमध्ये व हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या शेवाळे यांच्या घरातील एका खोलीमध्ये देशी विदेशी दारूचा अवैध साठा सापडला. पोलिसांनी पंचासमक्ष एक लाख 83 हजार 780 रुपये किमतीचा अवैध दारू जप्त करून ताब्यात घेतला.
याप्रकरणी हॉटेल चालक बंडू भारत पाटील (रा. गायगव्हाण ता. सांगोला ) याला ताब्यात घेतले असून हॉटेल मालक नवनाथ शत्रुघ्न पाटील याचा पोलीस शोध घेत आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याखाली, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, यांच्या मार्गदर्शक पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम शिंदे, सहायक पोलिस फौजदार नैबुद्दीन मुंढे, आप्पासाहेब कर्चे, शहाजी मोटे, संतोष जगताप, हेड कॉन्स्टेबल सुभाष शेंडगे, सुनील जाधव, पोलीस नाईक अमर सुरवसे, रवींद्र बाबर, गणेश इंगोले, जावेद पठाण, कॉन्स्टेबल रशिद मुलाणी, महिला हेडकॉन्स्टेबल मोनिका वाघे, महिला कॉन्स्टेबल दिपाली इंगोले व पोलीस नाईक राहुल शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे करत असून, अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा