पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आमदार समाधान आवताडे यांनी केले अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
भारतीय जनसंघाचे संस्थापक, सर्वांचे प्रेरणास्थान, अंत्योदय आणि मानवतावादाचे प्रणेते पंडित दिनदयाळ उपाध्याय जी यांच्या जयंतीनिमित्त आमदार समाधान आवताडे यांनी जनसंपर्क कार्यालय, पंढरपूर येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी बोलताना आ . आवताडे यांनी सांगितले की, भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्वाचे योगदान देणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पक्ष संघटनेतील कार्यतत्वे राजकीय व सामाजिक सेवाभावी कर्तव्यतत्परतेला नेहमीच आदर्शवत ठरत असतात. भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.
यावेळी श्री चांगदेव कांबळे सर, आध्यक्ष भास्कर कसगावडे, माऊली हळनवर, नितीन करंडे,दीपक येळे, बादल सिंह ठाकुर,धीरज म्हमाणे,प्रशांत सापणेकर, लक्ष्मण शिंदे,शैलेश आगवणे, विनोद राज लटके, भैय्यासाहेब कळसे, भास्कर तात्या जगताप, प्रा.शरद चव्हाण सर, आबासाहेब पाटील,प्रसाद सातपुते,अमोल धोत्रे, पांडूरंग वाडेकर, राहुल गावडे, शशीकांत म्हेत्रे सर, तेजस कलुबर्मे सर,संजय पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा