शेतकऱ्यांनी परिपक्व ऊस कारखान्याचे गळीतास द्यावा - प्रा शिवाजीराव काळुंगे
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२-२३ सालचा ३० व्या गळीत हंगामाचा बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ सोमवार दि २६ सप्टेबर २०२२ रोजी सकाळी ११ ३० वाजता कारखान्याचे माजी चेअरमन व धनश्री परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा श्री शिवाजीराव काळुंगे यांचे शुभहस्ते व कारखान्याचे माजी चेअरमन ॲड श्री नंदकुमार पवार यांचे अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात संपन्न झाला बाॅयलर प्रदिपन कार्यक्रमाचे सुरुवातीला कारखान्याचे व्हा चेअरमन श्री तानाजी लक्ष्मण खरात व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अर्चना तानाजी खरात यांचे शुभहस्ते श्री सत्यनारायण महापुजा करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन श्री राहूल शहा, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन श्री दामोदर देशमुख, जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक श्री रामकृष्ण नागणे, कारखान्याचे माजी व्हा चेअरमन श्री रामचंद्र वाकडे, माजी संचालक श्री यादाप्पा माळी उपस्थित होते कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करताना कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी यांनी केले व मा चेअरमनसाहेब,व्हा,चेअरमनसाहेब व कर्मचाऱ्याचे सहकाऱ्याने कारखाना मशिनरी गाळपासाठी तयार असलेचे सांगीतले
सदर प्रसंगी कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील मनोगतामध्ये म्हणाले, गेली दोन महिण्यापासून हे संचालक मंडळ काम करीत आहे आम्ही सत्तेत आलो त्यावेळी कारखान्याच्या खात्यावर फक्त रुपये तिन लाख शिल्लक होते ही संस्था अडचणीत आहे परंतु तालुक्याच्या विकासाचा केंद्र बिंदू असणारी ही संस्था चांगली चालली पाहिजे या उद्देशाने मार्गदर्शक प्रा शिवाजीराव काळुंगे, ॲड श्री नंदकुमार पवार, श्री राहूल शहा, दामोदर देशमुख, रामकृष्ण नागणे, रामचंद्र वाकडे, श्री यादाप्पा माळी यांनी मोलाची मदत केली आहे या गळीत हंगामासाठी तोडणी वाहतूक यंत्रणी पूर्ण क्षमतेने उभी केली आहे गेली दोन महिण्याच्या काळात कामगारांनी रात्रीचा दिवस करुन ऑफ सिझनमधील कामे पूर्ण केली आहेत, त्यामुळे कामगार अभिनंदनास पात्र आहेत एफ आर पी ची राहिलेली रक्कमही लौकरच शेतकऱ्यांना अदा करणार आहे आपणां सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या गळीत हंगामात ६ लाख मे टनाचे उदिष्ठ निश्चीतच पार केले जाईल अशी ग्वाही चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी दिली
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा शिवाजीराव काळुंगे यांनी बाॅयलर अग्नि प्रदिपन झालेचे जाहिर करताना म्हणाले कि, विद्यमान संचालक मंडळ हे चांगले काम करणारे आहे यापुढेही या संचालक मंडळाला आमची नेहमीच साथ असेल कमी कालावधीत कामगारांनी सर्व कामे वेळेत पूर्ण केली आहेत शेतकऱ्यांची ऊस बिले या संचालक मंडळाने अदा केली ही समाधानाची बाब आहे १ ऑक्टोबरला कारखाने चालू करण्याची तयार सर्वच कारखान्यांनी केली होती परंतु शासनाने १५ ऑक्टोबरला परवानगी दिल्याने तयारीला आणखी वेळ मिळाला आहे शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जाण्याची जबाबदारी संचालक मंडळाची असते आणि त्यादृष्टीने संचालक मंडळाने काम केले पाहिजे कारखाना आर्थिक अडचणीत आहे परंतु अडचणी हया येतच असतात व त्यातुन मार्गही निघत असतो शेतकऱ्यांनीही परिपक्व व आणि चांगल्या रिकव्हरीचा ऊस गळीतासाठी देणे गरजेचे असते या संचालक मंडळाने वाहन न वापरण्याचा निर्णय घेवून काटकसरीचे धोरण अवलंबले आहे हा निर्णय स्तुत्य आहे या गळीत हंगामात ६ लाख मे टनाचे उदिष्ठ निश्चीतच गाठेल असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड श्री नंदकुमार पवार मार्गदर्शन करताना म्हणाले कि, या संचालक मंडळातील अनेक जण मागील संचालक मंडळात काम केलेले आहेत कारखान्याच्या उशा-पायथ्याला मुबलक ऊस आहे त्यामुळे संचालक मंडळाने योग्य नियोजन केल्यास ठरविलेले गाळपाचे उद्षि्ठ गाठण्यास अडचण येणार नाही दामाजी कारखान्याचा ऊस वजन काटा अचूक असल्याने दामाजी कारखान्यावर सभासद-शेतकऱ्यांचा विश्वास आहे कारखान्याचा कामगार प्रामाणीकपणे काम करणारा असुन त्यांना विश्वासात घेवूनच काम करावे या संचालक मंडळाने चेअरमनना निर्णय घेण्याची मोकळीक दिली पाहिजे ऊस तोड होताना ऊसाची वरुन तोड होत आहे का याची बारकाईने माहिती संचालक मंडळाने घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी सुधारित ४३४ ऊसाची लागण केल्यास त्याला रिकव्हरी चांगली असल्याने बारा महिन्यात गळीतास जाणार असुन कारखान्यालाही परवडणार आहे सभासद रद्द न करण्याचा विषय वार्षिक सभेच्या विषय-पत्रिकेवर घेवून संचालक मंडळाने चांगला निर्णय घेतला आहे येथून पुढेही सतिचा वाण म्हणूनच संचालक मंडळाला काम करावे लागणार असल्याचे मत ॲड श्री नंदकुमार पवार यांनी व्यक्त केले
सदर प्रसंगी कारखान्याचे माजी चेअरमन सर्वश्री शशिकांत बुगडे, माजी संचालक प्रकाश गायकवाड, नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप, माजी संचालक मारुती वाकडे, भारत पाटील, जालिंदर व्हनुटगी, अशोक माळी, माजी नगराध्यक्ष भारत नागणे, चंद्रशेखर कोंडूभैरी, मनोज ठेंगील, काशिनाथ पाटील, नितीन पाटील, राजू पाटील, रामचंद्र सलगर, संतोष सोनगे, महावीर ठेंगील, संतोष मोगले, बबलू सुतार, अनिल वाघमोडे, तेजस खरात,मारुती शिंदे, रावसो गडदे, संपत गडदे, लक्ष्मण नागणे सर, रजपूत सर, प्रतिक किल्लेदार, दौलत माने, दुधाळ सर, मेटकरी सर, सुरेश पाटील, बिरुदेव मेटकरी, बुगडे सर अनेक गावचे सरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते
बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभप्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री पी बी पाटील, औदुंबर वाडदेकर,मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे आदि उपस्थित होते तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सभासद-शेतकरी, ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार, कर्मचारी वर्ग, कामगार संघटना व पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे आभार संचालक श्री दिगंबर भाकरे यांनी मानले तर सुत्रसंचालन श्री अशोक उन्हाळे यांनी केले
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा