इरा खान एंगेज्ड - गुडघ्यावर बसून नुपूरने घातली अंगठी
अमीर खानची मुलगी इरा खान गेले अनेक दिवस नुपूर शिखरेला डेट करत आहे. अमीर खानची हि लाडकी लेक एक बिनधास्त मुलगी आहे. तिने नुपूर सोबतचे रिलेशन कधी लपवले नाही. त्या दोघांचे व्हेकेशन मधले फोटोसुद्धा इराने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इरा तिच्या खाजगी आयुष्यातील गोष्टीसुद्धा सोशल मीडियावर शेअर करत असते.
नूपुरसोबतचे काही बोल्ड फोटोही तिने आजवर शेअर केले असून, त्यामुळेच अमीर खानची (amir khan ) लेक इरा खान (ira khan ) सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. मात्र, आमिरची लेक आता सिंगल नसून, मिंगल होण्याच्या तयारीत आहे. इरा बॉयफ्रेंड (boyfriend)नुपूर शिखरेसोबत एंगेज्ड झाली आहे. नुपूरने रोमँटिक अंदाजात इराला प्रपोज केले आणि आयराने होकार देताच, तिच्या हातात अंगठी घातली. नुपूर ने आपल्या स्वीट हार्टला ,' आर्यन मॅन इटली शो 'दरम्यान प्रपोज केले. याचा व्हिडिओ आयराने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
नुपूर स्पोर्ट्स काॅस्च्युममध्ये इरा जवळ येतो . आधी तो इराला किस करतो आणि मग गुडघ्यावर बसून रिंग काढत तिला प्रपोज करतो. नुपूर हे रोमँटिक प्रपोज ला बघून कमालीची उत्सुक होते. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती लगेच नुपूरला होकार देते आणि मग नुपूर तिच्या बोटात अंगठी घालतो. यानंतर कपल रोमँटिक होताना दिसते. आयरा नूपुरला किस करते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा