आलिया म्हणते , 'ब्रह्मास्त्र ' ने बॉक्स ऑफिस वर लावली आग
बॉलीवूड साठी वरदान ठरलेल्या ' ब्रह्मास्त्र ' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपट बॉयकॉट करण्याचा ट्रेंड झाला; पण याचा परिणाम ' ब्रह्मास्त्र ' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शन वर झाला नाही. चित्रपटाच्या यशाने संपूर्ण स्टार कॉस्ट आणि निर्माते खूप खुश आहेत. आता ब्रह्मास्त्रचा यशावर आलिया भटने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, आपल्याकडे एकच आयुष्य असतं आणि त्यात दोन पर्याय एक तर आपण सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. टीका, समीक्ष, प्रतिक्रिया हा प्रेक्षकांचा हक्क आहे. आम्ही नकारात्मकपेक्षा सकारात्मक गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काय जोरदार आग लावली.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा