पन्नास वर्षपूर्ती निमित्त मंगरूळ ग्रामस्था तर्फे दिले मानपत्र
शिवशाही वृत्तसेवा, कळंब
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील (बाबा) खंडापूरकर, यांच्या सामाजिक व राजकीय जीवनाला 50 वर्ष पूर्ण झाली च्या निमित्ताने मंगरूळ, तालुका कळंब येथील सर्व ग्रामस्थांतर्फे मानपत्र, शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
प्रदीप पाटील( बाबा) खंडापूरकर यांनी आजपर्यंत त्यांच्या सामाजिक जीवनात भ्रष्टाचार विरोधी आंदोलने, दारूबंदी करण्याबाबतची आंदोलने, शेतकऱ्यांच्या उसाबद्दलची आंदोलने, अंध अपंगांना न्याय देण्याबद्दलची आंदोलने, सर्वसामान्य जनतेची शासकीय कर्मचारी करत असलेल्या पिळवणुकीबद्दलची आंदोलने, अशा व इतर आंदोलनाची कृतज्ञता म्हणून मंगरूळ येथील सर्व ग्रामस्थांतर्फे हा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष अडवोकेट राणीताई स्वामी, प्रवक्त्या प्रा.अरुणाताई गुलबिले, धाराशिव जिल्हाध्यक्ष आनंदराव भालेकर, जिल्हा उपाध्यक्ष चक्रधर रितापुरे, कळंब तालुका अध्यक्ष तानाजी (काका) जाधव, आमीन भाई, मंगरूळ ग्रामपंचायत उपसरपंच समाधान कानडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष मनोज काळे तंटामुक्तीचे मा. अध्यक्ष अनिल रीतापुरे, मा.ग्रामपंचायत सदस्य बिभीषण गायकवाड, अविनाश रितापुरे, पोलीस पाटील राजेंद्र झांबरे, प्रतिष्ठित नागरिक दिलीपराव रीतापुरे, पांडुरंग रितापुरे, नानासाहेब रितापुरे ,दत्तात्रय रीतापुरे राहुल काळे, सौ इंदुबाई जाधव, सोनाली ताई जाधव , जिल्हा बँकेचे प्रताप माने ,सोना ठिबक सिंचनचे धनंजय जाधव , इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी संघटनेच्या विस्तारासाठी पदाधिकारी पदी नियुक्त्या करण्यात आल्या त्या खालील प्रमाणे आहेत धाराशिव महिला जिल्हाध्यक्षपदी मायावती कांबळे, कळंब तालुका उपाध्यक्षपदी अलिफ पठाण, ताई जाधव यांची अपंग विभागाच्या अध्यक्षपदी, तेजस जाधव यांची तालुका अपंग विभागाच्या पदी , मंगरूळ शाखा प्रमुखपदी शोभाताई तोर, , श्रीमती काळे इत्यादींच्या प्रदीप पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सदर सत्कार समारंभाला उत्तर देताना प्रदीप पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करून भ्रष्टाचार विरोधी, दारू बंदीविरोधी, अंध अपंगांना न्याय देण्याबद्दल आंदोलन करण्याची हाक दिली.सदर कार्यक्रमाला मंगरूळ येथील महिला व ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविला.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा