डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीने दिला जातो पुरस्कार
शिवशाही वृत्तसेवा, श्रीपुर
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांना साखर उद्योगात केलेल्या भरीव कामगिरीमुळे डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया या संस्थेचा साखर उद्योग गौरव पुरस्कार मिळाला. या पुरस्काराचे वितरण रविवारी पुणे येथे खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले.
प्रशांत परिचारक हे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असून त्याचे काका माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांचा सहकाराचा वारसा ते समर्थपणे चालवत आहेत . जिल्ह्यासह राज्यात साखर उद्योग अडचणीत असतानाही , ते चेअरमन असलेला पांडुरंग साखर कारखाना समर्थपणे चालवला तसेच एफ.आर.पी.सह सर्वच पातळ्यांवर कारखान्याला प्रागितिपथावर नेले आहे. त्यांच्या कारखान्यालाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया या संस्थेने त्यांना साखर उद्योग गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.
यावेळी जयंत पाटील साखर आयुक्त शेखर गायकवाड, डेक्कन शुगरचे अध्यक्ष एस. एस. गंगवती, एस.एस. भड, संचालक उमेश परिचारक, कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया ही संस्था देशपातळीवर साखळी उद्योगात काम करीत आहे. प्रत्येक वर्षी साखर उद्योगात उत्कृष्ट काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यास विविध पुरस्कार देऊन सन्मान करीत असते. पांडुरंग कारखान्याने सन 2022 मध्ये उत्कृष्ट कामकाज केले असून साखर उताऱ्यात सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी, दिनकर मोरे, वसंतराव देशमुख, हरीश गायकवाड, उमेश परिचारक रोहन परिचारक, ज्ञानदेव ढोबळे ,भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, गंगाराम विभुते , सुदाम मोरे , विजय जाधव, हनुमंत कदम, शामराव साळुंखे , राणू पाटील अर्बन बँकेचे संचालक हरीश पाटे, व्यवस्थापक उमेश विरधे उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा