आयोध्यात अवतरणार ' आदिपुरूष ' मधील श्रीराम
घोषणे पासून नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळं दिग्दर्शक ओम राऊत चा 'आदी पुरुष' प्रकाश झोतात राहिला आहे. प्रभास, क्रिती, सॅनोन, सैफ अली खान या हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांमुळं या चित्रपटाकडून अपेक्षा खूप वाढल्या आहेत. अशातच ' आदीपुरुष ' ची टीम आपला चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घेत आहे. याचाच एक भाग म्हणून ' आदीपुरुष' चार पहिला टिझर अयोध्येमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.
यासाठी आघाडीच्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आयोध्येमध्ये नेण्यात येणार आहे. नवरात्रोत्सव सुरू झाल्यावर दुसऱ्या दिवशी 27 सप्टेंबरला आयोध्यात कलाकार आणि तंत्रज्ञाच्या उपस्थितीत 'आदीपुरुष' ची पहिली झलक दाखवण्यात येणार होती, पण आता टिझर साठी ३ ऑक्टोंबर चा मुहूर्त काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आजवर केवळ पोस्टर मध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या रूपात दिसलेला प्रभास प्रथमच पडद्यावर राम रूपात प्रगटणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा