जिल्ह्यात मराठा भवन उभारण्यासाठी मोहिते - पाटील भेटले महसूलमंत्र्यांना
शिवशाही वृत्तसेवा अकलूज
सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या बांधव व विद्यार्थ्यांसाठी मराठा भवन आणि वसतिगृह बांधण्यासाठी शासकीय भूखंड व बांधकाम निधी मिळवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांच्याकडे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवन व वसतीगृह बांधण्यासाठी शासकीय भूखंड व निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती.
त्यानुसार सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मार्फत प्रस्ताव पाठवला होता. शासनाने तो मंजूर केला; परंतु मागील काही वर्षात त्याची कार्यवाही झाली नाही. पुनर्प्रस्ताव २०२१ मध्ये शासनाकडे पाठवला असून तो अद्यापही प्रलंबित आहे. यासंदर्भात आ. रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांची भेट घेऊन त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यावर महसूल मंत्री विखे- पाटील यांनीही याबाबत तत्काळ बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देण्याचे आव्हान दिल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा