maharashtra day, workers day, shivshahi news,

उजनी धरणातील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढा तालुक्यातील गावांसाठी देण्यात यावा - आ. समाधान आवताडे

उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा शंभरीकडे

ujani dam, samadhan autade, water for mangalwedha, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा मंगळवेढा  

सोलापूर जिल्ह्याची वरदायीनी असलेले उजनी धरण सद्य काळामध्ये पूर्णपणे भरले आहे. उजनी धरण पूर्णतः भरले असल्यामुळे अतिरिक्त पाणीसाठ्याचा लोंढा हा कर्नाटक राज्याच्या काही भागातील दिशेकडे प्रवाहीत होत असून हा पाण्याचा प्रवाह मंगळवेढा तालुक्यातील पाच पाणतळी यांच्या दिशेने वळविण्यात यावा अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी उजनी अधीक्षक अभियंता साळे यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केली आहे. 

सोलापूर जिल्ह्याच्या प्रादेशिक नकाशावर दुष्काळी तालुका म्हणून मंगळवेढा तालुक्याची ओळख आहे. गेली अनेक वर्षे पाण्यासारख्या अत्यावशक्य आणि संवेदनशील प्रश्नावर मंगळवेढा तालुक्यातील जनता संघर्ष करताना संपूर्ण सोलापूर जिल्हा पाहत आहे. अशा परिस्थितीमध्ये यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण पूर्णपणे भरले असताना धरण भरल्यानंतर शिल्लक पाणी कर्नाटक राज्यातील काही भागात वाहत जात आहे. वाहणाऱ्या या पाण्याचा प्रवाह थांबवून त्या पाण्याच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यात असणारी पाणी साठवण तलाव भरून द्यावीत अशी मागणी आ. आवताडे यांनी केली आहे.

पाठीमागच्या कालखंडामध्ये उजनी धरणातील २ टी. एम. सी. पाणी पळविण्याच्या मुद्द्यावर आ. आवताडे यांनी आंदोलनात उडी घेऊन आपली परखड भूमिका मांडली होती. पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील जनतेच्या जीवनप्रवासाचे केंद्रबिंदू असणाऱ्या पाणी प्रश्नावर आ. आवताडे हे नेहमीच जागरूक आणि कृतिशील भूमिका घेताना अनेकदा दिसून येत आहे.

 विधिमंडळ सभागृहाही मंगळवेढा तालुक्यातील विविध पाणी योजना मार्गी लावण्यासाठी व निधी उपलब्ध करणेसाठी आ. आवताडे हे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे उजनी धरणातील पाणी अडवून ते मंगळवेढा तालुक्यासाठी उपलब्ध करावे अशी जोरदार मागणी आ. आवताडे यांनी केली आहे. यावर्षी झालेल्या पाऊस काळामध्ये मंगळवेढा तालुक्यात अपेक्षेपेक्षा खूपच कमी प्रमाणात वरुणराजाने आपली हजेरी लावली आहे. पेरणी केलेली अनेक पिके पाण्याअभावी कात टाकताना दिसून येत आहेत. त्यामुळे अशा समस्येतून सुवर्णमध्य काढून शेतकऱ्यांना काहीअंशी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे साठवण तलाव भरून देणे खूप गरजेचे असल्याचे मत आ. आवताडे यांनी मांडले आहे. सदर साठवण तलाव भरून दिल्यामुळे या साठवण तलावाच्या परिसरात असणाऱ्या शेती क्षेत्रापैकी बराचसा भाग ओलिताखाली येणार असल्याचेही आ. समाधान आवताडे यांनी सांगितले आहे.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !