मला लोक घाबरायचे त्यामुळे कोणी मला प्रपोज नाही केलं - पंकजा मुंडेंची खंत
माजी मंत्री पंकजा मुंडे pankaja munde या आपल्या बेधडक वागण्या बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलाखती आणि विधाने नेहमीच चर्चेत राहत असतात. आताही झी मराठी वरील एका कार्यक्रमात आपल्या कॉलेज लाईफ विषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत तसेच काही गुलाबी क्षणांना आपण मुकलो असल्याची खंत व्यक्त केली आहे.
सध्या झी मराठी zee marathi वाहिनीवर बस बाई बस हा रियालिटी टॉक शो चालू आहे यामध्ये राजकीय तसेच सेलिब्रेटी महिलांना निमंत्रित करून त्यांच्या करिअर आणि आयुष्याबद्दल जाणून घेतले जाते. झी मराठीचा बस बाई बस हा शो चित्रपट अभिनेता सुबोध भावे subodh bhave होस्ट करत आहे. या शो मधून मध्ये आलेल्या सेलिब्रिटी पाहुण्यांना इतर महिला कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
झी मराठीच्या बस बाई बस या शोमध्ये नुकत्याच माजी मंत्री पंकजा मुंडे आल्या होत्या. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले त्यामध्ये एका महिलेने पंकजा मुंडे यांना कॉलेज लाईफ बद्दल विचारले असता पंकजा मुंडे यांनी सांगितले की "मी कॉलेजला असताना माझे बाबा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे त्यावेळी गृहमंत्री होते त्यामुळे मलाही खूप सिक्युरिटी होती. त्यामुळे सहसा माझ्याशी बोलण्याचा कोणी प्रयत्न करत नसेल आणि लोक मला घाबरत असत परंतु माझी एकदा कोणाची मैत्री झाली की झालीच मग ती कायमची" असे उत्तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
यावर या महिलेने पुन्हा एक प्रश्न विचारला की "कॉलेजमध्ये असताना प्रत्येकाच्या काही खास गोष्टी असतातच. एवढ्या टाईट सेक्युरिटी मधून घुसून कोणी तुम्हाला प्रपोज केले आहे काय ?" या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी "नाही! मला कोणीच प्रपोज केले नाही, तो सुखद अनुभव मला कधीच आला नाही." असे दिलखुलास उत्तर दिले आणि झी मराठीच्या बस बाई बस या कार्यक्रमाच्या मंचावर एकच हशा पिकला त्या हास्य कल्लोळात या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सुबोध भावे आणि स्वतः माझी मंत्री पंकजा मुंडे हे देखील सामील होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा