हर घर तिरंगा उपक्रम म्हणजे देशप्रेमाची आनंदमय व व्यापक संकल्पना - आ. समाधान आवताडे
शिवशाही वृत्तसेवा मंगळवेढा ( राज सारवडे )
हर घर तिरंगा हा देशप्रेमाच्या दृष्टीकोनातून आनंदमय व व्यापक संकल्पना असल्याचे प्रतिपादन पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा व क्रांतिदिन या राष्ट्रीय अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, मंगळवेढा यांच्या वतीने मंगळवेढा शहरात आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तब्बल ३५० फूट लांब तिरंगा ध्वज पदयात्रा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
हजारो स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपली पुण्यभू भारतमाता परकीयांच्या जोखडातून मुक्त झाली आहे. स्वातंत्र्यलढ्यातील या वीरांच्या बलिदानाचे स्मरण करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. तरुणाईच्या श्वासात देशभक्तीचे स्फुल्लींग चेतावण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक, वीर जवान, धारातीर्थी पडलेल्या सैनिकांसह तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यासाठी या भव्य - दिव्य रॅलीचे आयोजन केले होते.
या रॅलीसाठी भाजपा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार डॉ स्वप्निल रावडे, नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, पोलीस निरीक्षक रणजित माने, माजी प्राचार्य प्रा. येताळा भगत, माजी संचालक राजेंद्र सुरवसे, सुरेश भाकरे, भारत निकम, विजय माने, युवराज शिंदे, सुधाकर मासाळ, दिगंबर यादव, माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, महादेव जाधव, सुदर्शन यादव, दत्तात्रय साबणे, भारत गरंडे, दामाजी बंडगर, राजू मेतकुटे, धनंजय पाटील, भारत कोळेकर, बाबा कोंडूभैरी, विजय बुरकूल, जनार्धन कोंडूभैरी, योगेश फुगारे, परमेश्वर पाटील, सुशांत हजारे आदी मान्यवर
व विविध राजकीय राजकीय पक्षांचे पदाधिकारी, यांच्यासह इतर अधिकारी वर्ग व विविध शाळा - कॉलेज चे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध कार्यक्षेत्रातील मान्यवर मंडळी सर्व शासकीय अधिकारी, पदाधिकारी, मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा