अभिजित आबा पाटील आणि महादेव तळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
विठ्ठल परिवाराचे नेते, चेअरमन अभिजीत पाटील आणि भोसे येथील युवा नेते प्रा. महादेव तळेकर यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने रविवार दि 7 आगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे भव्य किर्तन होणार आहे.
वरील वाढदिवसानिमित्त यशवंत विद्यालय भोसे येथे सायंकाळी 7 वाजता या समाजप्रबोधन किर्तनास सुरुवात होणार आहें. तसेच यावेळी वाढदिवसानिमित्त चेअरमन अभिजीत पाटील आणि प्रा. महादेव तळेकर यांचा सन्मानही भोसे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहें, तरी भोसे परिसरातील भाविक भक्त आणि ग्रामस्थ यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही समस्त भोसेकरांच्या वतीने करण्यात आले आहें.
nivrutti maharaj deshmukh indurikar #nivruttimaharaj #deshmukh #indurikar
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा