वयाच्या ७६ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूरचे प्रसिद्ध पत्रकार तथा माजी नगरसेवक महेश शशिकांत खिस्ते यांच्या मातोश्री श्रीमती वासंती शशिकांत खिस्ते यांचे रात्री साडेबाराच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले त्या 76 वर्षाच्या होत्या
श्रीमती वासंती खिस्ते या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते परंतु वृद्धापकाळामुळे त्याचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र औषधोपचारांचा परिणाम होत नव्हता. शेवटी दिनांक 4 ऑगस्ट रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा पत्रकार महेश खिस्ते यांच्या सह सुना, मुलगी,जावई, आणि नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर दिनांक ५ रोजी सकाळी १० वाजता पंढरपूर येथील वैकुंठ स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा