आषाढी वारी बरोबरच पंढरीत ”सुपरस्टार” सर्कस दाखल.
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर येथे सुमारे दोन वर्षानंतर आता आषाढी वारी भरत असून रसीकप्रेक्षकांसाठी राज्यात गाजलेली सुपरस्टार सर्कस, सरगम टॉकीज शेजारील मैदानात सोमवार दि४जुलै पासून येत आहे, अशी माहिती या सर्कस चे संचालक श्री प्रकाश महादेव माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवार दिनांक ४जुलै रोजी सुरु होणार असुन माजी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले,माजी उपनगराध्यक्ष नागोश भोसले,शिवसेना नेते जयंत माने व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. जिम्नॅस्टिक कसरती आणि चित्तथरारक विविध धाडसी खेळ पहावयास मिळणार आहेत.
या सर्कस मध्ये नेपाळ, आसाम,केरळ,तामिळनाडू, आंध्रप्रदेश , गुजरात, महाराष्ट मधील कलाकारांचा समावेश असुन अनेक नाविन्यपुर्ण व नेत्रदिपक प्रयोग सादर केले जाणार आहेत.
सर्कस मध्ये कलाकारासह ७० कसरतपटू कला सादर करणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना लॉक डाऊन असल्याने कलाकार,कामगार यांना स्वखर्चाने सांभाळले,सर्कस चालविताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे माने यांनी सांगितले.
येथील यात्रा काळात सर्कस येणे ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. तुफान वेगाने होणारी मोटारसायकल जंप, मृत्यूगोल,विविध जिम्नॅस्टिक प्रकार अशी कधीही न पाहिलेली कला पहावयास मिळणार आहे,पंढरपूर येथे ही सुपरस्टार सर्कस १महिना असेल,दररोज ३शो दाखविले जाणार आहेत, कायद्याच्या चौकटीत राहून विविध नियम पाळावे लागतात,लहान मुले ,जंगली प्राणी,पाळीव प्राणी, पशु पक्षी यांच्या कला सादर करता येत नाहीत, वाघ,सिंह,हत्ती,जिराफ असे प्राणी सर्कशीत असल्याने ती पाहण्यास गर्दी व्हायची,तसा प्रेक्षकवर्ग आता लाभत नाही अशी खंत संचालक प्रकाश माने यांनी व्यक्त केली.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा