maharashtra day, workers day, shivshahi news,

शेतकरी सभासद, कामगार, तोडणी वाहतूकदार, यांचे संसार उघड्यावर पडू देणार नाही - अभिजित पाटील

विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूक संदर्भात करकंब सभेत अभिजित पाटील यांनी दिली ग्वाही 

Vitthal sugar election, Abhijit patil, shivshahi news, pandharpur,


शिवशाही वृत्तसेवा, करकंब

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कर्मवीर माजी आमदार औदुंबर आण्णा पाटील यांनी राज्यभरात नावलौकिक मिळवून शेतकरी सभासद, कामगार वर्ग ऊस तोडणीदार वाहतूकदार तसेच करकंब आणि करकंब सह 42 गावातील सर्वसामान्य लोकांचे संसार फुलवण्याचे काम ज्या तत्वाने केले. त्याच तत्वाची अंमलबजावणी करून साक्ष आपल्याला समोर ठेवून अखेरच्या श्वासापर्यंत या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून करकंब सह 42 गावातील स्वाभिमानी सभासद कामगार वर्ग ऊस वाहतूकदार व तोडणीदार आणि सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन त्यांचे संसार उघड्यावर पडू देणार नाही असे मत श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी पॅनल प्रमुख अभिजीत उर्फ आबा पाटील यांनी करकंब येथील जाहीर सभेत व्यक्त केले.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब आंबुरे रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष नंदकुमार व्यवहारे पै. सुभाष गुळमे उद्योजक अमोल दादा शेळके आदी मान्यवरांसह या भागातील मान्यवर तसेच पंढरपूर तालुक्यातील पदाधिकारी सभासद आणि या भागातील करकंब सह या गटातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी युवक वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले; की कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असून गेल्या अनेक वर्षापासून हे संचालक मंडळ कारखान्यावर असून या लोकांना कारखाना सुरू करता आला नाही. सभासदांचे बिल दिले नाहीत. तोडणी वाहतूक दारांचे बिल देता आले नाहीत. ही कारखान्याची निवडणूक आहे विरोधकांनी कारखान्यावर संबंधित बोलावे ...जर त्यांच्यात हिंमत असेल ...तर त्यांनी जरूर शिवतीर्थावर यावे ...त्याठिकाणी  त्यांच्या कार्यकाळातील केलेल्या अहवालाचा पुरावा देण्यास तयार असल्याचे सांगितले. आज पर्यंत या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून एक शेतकरी सभासदाचा मुलगा या नात्याने स्वाभिमानी सभासद कामगार वर्ग ऊस तोडणी कामगार वाहतूकदार त्याचबरोबर याचा अर्थ कारणावर अवलंबून असलेल्या करकंब सह गावातील अगदी लहान मोठे उद्योग धंदे व्यवसायिक असलेल्या लोकांच्या व्यवसायावर आज पर्यंत मोठा परिणाम झाल्यामुळे या तालुक्याचे आर्थिक अर्थकारण पूर्णतः कोलमडले असल्याने शेतकरी सभासद कामगार आणि त्याच बरोबर सामान्य आणि व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने यासाठी पुन्हा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कर्मवीर औदुंबर अण्णांच्या तत्त्वाप्रमाणे या कारखान्यास पुन्हा गतवैभव निर्माण करून या तालुक्याचे आणि करकंब सह 42 गावातील अर्थकारण पूर्वपदावर आणावे लागेल. त्याची ग्वाही देऊन त्यांनी संबंधित व्यापारी वर्गाला ही श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून जे उमेदवार असतील त्यांना निश्चित पणाने आपल्या जवळच्या सर्वच नातेवाईक मित्र यांना कारखाना कोण कशा पद्धतीने चालू शकतो आणि त्याच पद्धतीने या भागाचे अर्थकारण कसे फिरवू शकतो. यामाध्यमातून त्यांनी बाजार पेठे बरोबर अनेकांचे संसार फुलवण्याचे काम करून एक भावनिक साद घालून यावेळी निवडून देण्याचे आवाहन केले. 

यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनीही या कारखाना संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन करुन आपली सडेतोड भूमिका मांडली.


------------------------------------------------------------------------------------ 

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !