शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधित राखत प्रशालेची यशस्वी घोडदौड
शिवशाही वृत्तसेवा टेंभुर्णी (नवनाथ नांगरे)
येथील जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रमशाळेचा इ१०वी चा निकाल शंभर टक्के लागला असून शंभर टक्के निकालाची परंपरा जोपासत प्रशालेने शैक्षणिक गुणवत्तेच्या शिखरावर पुन्हा एकदा मानाचा झेंडा फडकावला आहे. अतिशय सर्वसामान्यांची- गरिबांची-अनाथांची-भटक्या-विमुक्तांची मुले असणाऱ्या टेंभुर्णी च्या आश्रम शाळेत गुणवत्तेचं नाणं जोरदार खणखणत असल्याची ललकारी आज टेंभुर्णी शहर परिसरात गुंजली आहे.
प्रशालेतील पहिले तीन मानकरी
प्रथम- तेजश्री उत्तम खरात ८५.८०%
द्वितीय-श्रावणी राजेंद्र शिरसागर ८४.८०%
तृतीय - सपना दीपक खरात ८४.२०%
विशेष प्राविण्य च्या पुढे २५ विद्यार्थी
प्रथम श्रेणीत ०७ विद्यार्थी
वरील निकाल पाहता सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सोबत घेणारीआश्रम शाळा ही उत्तम गुणवत्तेचे प्रतीक असल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे संस्थापक कैलास सातपुते सर, मुख्याध्यापिका जयश्री गवळी मॅडम, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका संतोषी अगावणे मॅडम यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना माध्यमिक विभागामधील विद्या शेलार मॅडम, प्रमिला वाघमारे मॅडम , काकासाहेब पुजारी सर , धनाजी तनपुरे सर, आणि किशोर गणगे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले त्याबद्दल त्यांचे संस्थापक कैलास सातपुते सर, मुख्याध्यापिका जयश्री गवळी मॅडम, प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका संतोषी अगावणे मॅडम यांनी मनोमन कौतुक केले. प्रशालेच्या या यशस्वी गरूडभरारीची चर्चा टेंभुर्णी शहर आणि परिसरातून विद्यार्थी-पालकवर्गात जोरदार सुरू आहे.
भटक्या-विमुक्तांना आणि सर्वसामान्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा शासनाचा सर्वसाधारण हेतू असला तरी आम्ही मात्र गुणवत्तेच्या उच्च प्रवाहात नेहमीच विद्यार्थ्यांना पोहोचवले आहे. यापुढेही गुणवत्तेचा झेंडा असाच फडकत राहील. सर्व शिक्षक स्टाफ त्यासाठी कटिबद्ध असेल असा माझा ठाम विश्वास आहे
संस्थापक- कैलास सातपुते सर
प्रशालेची शैक्षणिक गुणवत्ता टिकवणे आणि वाढवणे हेच आमचे अंतिम ध्येय असून शैक्षणिक गुणवत्तेचा हा चढता आलेख कायम चढताच राहील, यात माझा शिक्षक स्टाफ कधीही कसूर करणार नाही. उलट दुप्पट ऊर्जा सोबत घेऊन काम करेल, असं मी निश्चितपणाने सांगते.
मुख्याध्यापिका -जयश्री गवळी मॅडम
टेंभुर्णी आश्रम शाळेने आज पर्यंत नेहमीच गुणवत्ता सिद्ध करून समस्त टेंभुर्णीकरांची विश्वासहर्ता अखंड जपली आहे. निशुल्क ज्ञानसेवे सोबतच गणवेश आणि शैक्षणिक साहित्य दान करणाऱ्या या प्रशालेमध्ये पालकांनी डोळेझाकपणे मुले पाठवावीत आणि आपल्या पाल्याच्या जीवनाचं सोनं करून घ्यावं ,असं मी ठाम पणे सांगू इच्छितो
पालक- राजेंद्र क्षीरसागर महादेव गल्ली, टेंभुर्णी
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा