आषाढी एकादशी दिवशी पंचायत समितीच्या प्रांगणात संपन्न होणार कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी चा समारोप कार्यक्रम रविवारी दिनांक 10 जुलै 2022 रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या प्रांगणात संपन्न होत आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा समारोप समारंभ होणार आहे या कार्यक्रमास खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील आमदार अरुण लाड आमदार जयंत तासगावकर आमदार सुभाष देशमुख आमदार बबनराव शिंदे आमदार विजयकुमार देशमुख आमदार प्रणिती शिंदे आमदार शहाजी पाटील आमदार राजेंद्र राऊत आमदार संजय मामा शिंदे आमदार यशवंत माने आमदार समाधान आवताडे आमदार सचिन कल्याण सिटी आमदार राम सातपुते तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग सचिव अभय महाजन व पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी जलजीवन मिशन संचालक रवींद्र शिंदे स्वच्छ भारत मिशन प्रकल्प संचालक रणजीत सोमवंशी हे अधिकारी निमंत्रक असणार आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा