गण निहाय आरक्षण सोडत जाहीर
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर पंचायत समितीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले आहे. पंचायत समितीच्या शेतकी भवन हॉलमध्ये, लॉटरी पद्धतीने ही आरक्षणाची सोडत काढण्यात आली. प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर आणि गट विकास अधिकारी प्रशांत काळे, यांच्या सर्व राजकीय पक्षांची प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. येत्या पंचायत समिती निवडणुकीत एकूण वीस गणांमध्ये 94 ग्रामपंचायतीचा समावेश होतो. 2011 च्या जनगणनेनुसार तीन लाख, 43 हजार, 445 इतकी लोकसंख्या या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात आहे.
पंचायत समितीच्या येत्या निवडणुकीत, उंबरे गण - सर्वसाधारण, भोसे गण - अनुसूचित जाती महिला, करकंब गण -सर्वसाधारण, मेंढापूर गण - सर्वसाधारण महिला, रोपळे गण - सर्वसाधारण महिला, देगाव गण - सर्वसाधारण महिला, फुलचिंचोली गण - सर्वसाधारण,पुळुज गण - सर्वसाधारण, चळे गण - सर्वसाधारण महिला, गोपाळपूर गण - ओबीसी महिला, गुरसाळे गण - ओबीसी, पिराची कुरोली गण - अनुसूचित जाती, भाळवणी गण - सर्वसाधारण, पळशी गण - ओबीसी महिला, भंडी शेगाव गण - सर्वसाधारण, वाखरी गण - अनुसूचित जाती महिला, टाकळी गण - ओबीसी, खर्डी गण - सर्वसाधारण, कासेगाव गण - ओबीसी महिला, तावशी गण - सर्वसाधारण महिला, असे गण निहाय आरक्षण पडले आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा