maharashtra day, workers day, shivshahi news,

अभिजीत पाटील यांचे पॅनल निवडणूक रिंगणात उतरणारच

विठ्ठलच्या सत्ताधारी आणि विरोधकमधील धडकी कायम 

vitthal sugar, election, abhijit patil, bhagirath bhalake, pandharpur, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर करखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी मागील अनेक महिन्यापासून पूर्ण ताकदीने जी तयारी सुरू आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकात धडकी भरली होती. परंतु उमेदवारी अर्जाच्या छाननी वेळी दस्तुरखुद्द पॅनल प्रमुख असलेले अभिजित पाटील यांच्या विरोधात काही मुद्यावर हरकती घेतली होती. त्याचा लवकरच फैसला होणार आहे. यामुळे विठ्ठलच्या निवडणुकीत ताकदीने लढण्यासाठी मोठे बळ मिळणार आहे.

   अभिजित पाटील यांनी विठ्ठलच्या निवडणुकीत उतरताना केवळ स्वतःला चेअरमन मिळावे या भूमिकेतून निवडणूक लढविण्यासाठी तयारी केलेली नाही. केवळ सभासद आणि कामगार यांच्या हिताचे निर्णय घेणारे संचालक मंडळ असावे याच भूमिकेतून निवडणुक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. अभिजित पाटील यांनी कारखाना सभासद कार्यक्षेत्र असलेल्या विविध भागांतून आपला गावभेट, आणि बहुतावशी सभासद यांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या आहेत. यामुळे प्रत्येक सभासद यांच्यापर्यंत कारखाना चांगला चालवून दाखविणारे म्हणुन त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

  अभिजीत पाटील यांच्या पॅनलमधुन उमेदवारी मिळावी म्हणून प्रत्येक गटातून अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये काही अर्ज छाननी वेळी नामंजूर करण्यात आले आहेत. असे असले तरी तगडे पॅनल या विठ्ठलच्या निवडणुकीत उतरविण्यासाठी मोठी व्युहरचना आखली जात आहे. केवळ संचालकांच्या वैयक्तिक हिताचे निर्णय न घेता सभासद आणि कामगार यांच्याच हिताचे निर्णय घेणारे पॅनल या निवडणुकीत उत्तरविणार असल्याचेही अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.

 सध्या मागील अनेक महिन्यापासून विठ्ठलच्या निवडणुकीत उतरून एक आदर्श निर्माण करण्यासाठी अभिजीत पाटील यांनी पाऊल टाकले आहे. कारखाना अडचणीत असतानाही प्रति टन 2500रुपये भाव नक्की देणार असल्याचे जाहीर करून टाकल्याने जिल्ह्यातील साखर कारखानदार यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही 2500 रुपये भाव देण्याची अभिजित पाटील यांनी केलेली घोषणा ही मोठी धक्कादायक बाब असल्याने, यांना विठ्ठलच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेक प्रकारे अडचणी करण्यासाठी अनेक गुप्त शक्ती प्रयत्न करीत आहेत. मात्र या निवडणुकीत सभासद आणि कामगार यांच्या दृष्टीने स्वतःच्या प्रपंचाशी निगडित असलेली ही विठ्ठलची निवडणूक असल्याने,आतापर्यंत नुकसान केलेल्या लोकांना विठ्ठलची सत्ता देणार की आपल्या फायद्यासाठी कोणाला मतदान करणार हे मतमोजणी झाल्यावरच समजणार आहे .

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !