माझ्याकडे कारखाना नाही आला तर मी सांगोल्याला ऊस घालेन तुम्ही काय हॉस्पिटलमध्ये नेणार का ?
निवडणुकीत तुमची १९३ पाने लिहिली आहेत प्रचारात वाचणार
पंढरपूर - विठ्ठलची निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्ताधारी व विरोधी गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.विठ्ठलसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.विठ्ठलसाठी धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्याअगोदर त्यांनी आज शिवतीर्थावरून वारकरी वेशात आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली काढली होती.बैलगाडीतून वारकरी वेशात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्याअगोदर त्यांनी शिवतीर्थावर जमलेल्या लोकांना संबोधित करताना सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले आहेत.तुम्ही अमुक अमक्याचा मुलगा,तमुक व्यक्तीचा नातू म्हणून सगळ्यांना आपला वारसा सांगत आहात तर दुसरीकडे कारखाना बंद पाडून शेतकरी कामगार व सभासदांना फसवत आहात.विठ्ठलची निवडणूक ही विकासावर लढायला हवी ती तुम्ही वारशावर लढत आहात.तुम्ही माझ्या काही जवळच्या लोकांना आणि शेतकऱ्यांना भीती घालत आहात की ह्यांच्याकडे कारखाना नाही आला तर उसाचं काय करणार?आम्हाला कारखाना नाही आला तर आम्ही सांगोला कारखान्याकडे ऊस नेऊ पण तुमच्याकडे नाही आला तर तुम्ही काय हॉस्पिटलमध्ये नेणार का? असा घणाघात युवराज पाटील यांचे न घेता त्यांनी केला.निवडणूकीत तुमच्यावर बोलायला मी १९३ पाने लिहिली आहेत रोज एक एक पान वाचून दाखवेन आणि तुमचा भ्रष्टाचार उघडा पाडेन असा सूचक इशाराही त्यांनी दिला.सोबतच "तुमच्या दारावर सत्ताधारी मतासाठी आले तर त्यांनी १०९ कोटींचा हिशोब मागा,विठ्ठलचा प्रत्येक सभासद म्हणजेच विठ्ठल परिवार आहे.माझ्याकडे कारखाना आला तर जिल्ह्यात सगळ्या कारखान्यांपेक्षा ५० रुपये ज्यादा दर देईन असेही त्यांनी यावेळी घोषित केले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा