भव्य मिरवणूकीत आमदार समाधान आवताडेंचे शक्ती प्रदर्शन
शिवशाही वृत्तसेवा मंगळवेढा (राज सारवडे )
मंगळवेढा तालुका व पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी बंधू व सभासद बांधवाच्या सहकार अस्मितेचे प्रतिक असलेल्या श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवेढा शहर ऊस उत्पादक गटातून पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम लोकप्रतिनिधी तथा दामाजी शुगर चे यशस्वी विद्यमान चेअरमन आमदार मा. समाधान दादा आवताडे यांनी जेष्ठ मार्गदर्शक आदरणीय बापूंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला.
आ. समाधान आवताडे यांच्या विधायक कार्यनेतृत्वावर प्रचंड विश्वास आणि आशा असलेल्या तमाम सभासद बंधूनी व युवक कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आ. समाधान आवताडे व त्यांच्या नेतृत्वाखाली आस्तित्वात आलेल्या श्री. संत दामाजी शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा यावेळी निर्धार केला. यावेळी सन्माननीय संचालक मंडळ, मंगळवेढा तालुका शहर व ग्रामीण विभागातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा