श्री विठ्ठल सहकारी कारखान्याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणार
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पटवर्धन कुरोली येथील विचार विनिमय सभेतील गर्दी आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहून भारावून गेल्याची भावना धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली आहे. 'आपण खरंच चांगलं काम केलं तर लोक त्यांचं प्रेम असं व्यक्त करतात. लोकशाहीत लोक सर्वोच्च असतात, आणि लोकांना कळत असतं त्याच्यासाठी काय चांगलं आणि वाईट', असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे त्यांनी विश्वास व्यक्त केला की, 'विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या प्रत्येक सभासदाचं हित आणि कारखाना मी जपेन. सक्षमपणे चालवून दाखवेन! हा पंढरपूरच्या शेतकऱ्यांचा राजवाडा आहे, हे ह्या भूमीच गतवैभव आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण हे गतवैभव आणि विठ्ठलचे सोनेरी दिवस परत आणूयात.'
पाटील म्हणाले, 'तुंगत पाठोपाठ पटवर्धन कुरोलीत आज शेतकरी आणि सभासदांनी जो प्रतिसाद दिला आहे तो बदलाची नांदी आणि परिवर्तनाचा एल्गार आहे. शेतकऱ्यांना चांगला दर, सक्षम कारखाना , कुशल कामगार , प्रामाणिक संचालक मंडळ देऊन मागील ऊस बील, कामगार पगार, वाहतूक ठेकेदारांची थकीत देणी देऊनच कारखाना सुरू करण्याचे हि दिले.'
कै.औदुंबर आण्णा यांनी हा आदर्श कारखाना उभा करताना विकासाचे धोरण मांडले होते. शेतकऱ्यांचे हित, कामगारांचे हित आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांचा विचार करून विठ्ठल साखर कारखान्याची पायाभरणी केली होती. अण्णांच्या याच कामाचा आणि प्रगतीचा वारसा आपण कारखान्याच्या माध्यमातून पुढे नेऊ. कारखाना क्षेत्रातील सभासद, शेतकरी, कामगार यांचे हित साधले जाईल. कारखाना ही कुणाची खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे न समजता इथला मालक हा प्रत्येक सभासद असेल. शेतकरी, कामगार हे इथले भागधारक आहेत हे खऱ्या अर्थाने मालक आहेत. कै कर्मवीर आण्णांनी हा जो शेतकऱ्यांचा राजवाडा उभा केला आहे, तो अण्णांच्या विचारावर चालून, आण्णांचे विकासाचे व्हिजन आत्मसात करून शेतकरी हित जोपासण्यासाठीच हा कारखाना ओळखला जाईल',असेही अभिजीत पाटील म्हणाले.
कालच्या सभेत ज्या पद्धतीने लोकांनी अभिजीत पाटील यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले, त्यांना प्रतिसाद दिला, त्यावरून पंढरपूर तालुक्यात फक्त अभिजीत पाटील याच नावाची चर्चा रंगलेली दिसून येत आहे. तुंगत नंतर पटवर्धन कुरोली येथे मोठा प्रतिसाद अभिजीत पाटील यांना मिळाल्याने आता पुढची सभा कुठे याबद्दल तालुक्यात चर्चा आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा