सामाजिक सलोखा वाढीस लागावा यासाठी स्तुत्य उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा टेंभूर्णी, नवनाथ नांगरे
येथील आई-बाबा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने चव्हाणवाडी गावात नवनाथ नांगरे यांच्या निवास्थानी रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
टेंभुर्णी शहर परिसरातून काझी वस्तीवरून बहुतांश इस्लाम बांधव या पार्टीत सहभागी झाले होते. चव्हाणवाडी गावचे सरपंच सुनील मिस्कीन , उपसरपंच बाळासाहेब मोटेसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आई-बाबा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ नांगरे यांनी २७ वा रोजा धरल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
अन्नावाचून नाही पण पाण्याच्या एकेका थेंबावाचून जीव किती तडफडतो हे एक दिवसाचा रोजा केल्याने मला कळले. समस्त मानव जातीमध्ये सामाजिक सलोखा जपण्यासाठी मानवतेची शुद्ध भावना जपणे आणि अर्थातच. हाच आई-बाबा फाऊंडेशनचा प्रामाणिक दृष्टिकोन असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी कमाल भाई काझी, इम्रान भैय्या, इरफान रस्तापुरे यांनी इफ्तार पार्टीबद्दल फाउंडेशन कौतुक करत आभार मानले. यावेळी ॲड .महेश खरात सर यांनी "" फाउंडेशन नेहमीच सर्व जाती धर्मांना एकत्र करून मानवतेचा शुभ संदेश देणारेच उपक्रम करत आले आहे आणि करतच राहील, असे मत व्यक्त केले. यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र कदम , खजिनदार धनंजय सलगर यांनी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना भरभरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत नांगरे, अविनाश नांगरे, वैष्णव नांगरे, विजय नांगरे, वैभव नांगरे यांनी विशेष प्रयत्न केले.
सामाजिक सलोखा जपण्याचे एक पाऊल फाउंडेशन तर्फे राबवले गेले असल्याचे मत टेंभुर्णी शहर परिसरातून व्यक्त होत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा