शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
रोपळे (ता . पंढरपूर ) येथील श्री . शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी कोरोनाच्या काळात शिक्षणाची गंगा अखंडीत चालु ठेवल्याबद्दल शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला . अध्यक्षस्थानी वाशिम जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाचे अधीक्षक शिवाजी भोसले होते .
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब पाटील , मुख्याध्यापक बी यु पाटील, पर्यवेक्षक चंद्रकांत पाटील, निवृत्त कृषी पर्यवेक्षक मधुकर गुंजाळ, रोपळे विकास प्रतिष्ठानचे अर्जुन भोसले, प्रदीप भोसले , सुरेश निंबाळकर , विनायक निंबाळकर, नारायण गायकवाड, सिद्धेश्वर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान कोरोनाच्या काळात शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून या प्रशालेतील शिक्षकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळेचे कामकाज सुरू ठेवले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही . त्यासाठी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन काळे व ग्रामस्थांच्यावतीने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला .
यामध्ये मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला . यावेळी बोलताना वाशिम जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाचे अधीक्षक शिवाजी भोसले यांनी आपल्या भाषणात रोपळेतील शाळा कोरोनाच्या काळातही अखंडित चालू राहिली ती केवळ इथल्या शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच . शिक्षकांच्या या कार्याची दखल शाळा व्यवस्थापन समितीने घेवून त्यांचा सन्मान केला . हे कार्य खूपच महान आहे . शिक्षक त्यांचे काम करत राहतात . मात्र त्यांचे काम आज खऱ्या अर्थाने गावकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचे समाधान वाटते .
SHIVSHAHI NEWS CHANNEL -
प्रशालेतील ध्वजारोहन शिपाई अंकूष भोसले यांच्या हस्ते करण्यात आले . सुत्रसंचालन रविंद्र क्षीरसागर यांनी केले . तर आभार श्री . आप्पासाो कंदले यांनी मानले .
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा