डॉ शितल के शहा यांची आमदार समाधान आवताडे यांनी घेतली भेट
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर शहरांमधील सुप्रसिद्ध व नामवंत बालतज्ञ डॉ. शितल शहा यांच्या हॉस्पिटल मध्ये बुधवारी एन आय सी यु इन्वर्टर बॅटरी ची चोरी झाली होती. चोरी करणाऱ्या चोरास तात्काळ अटक करण्यात आली, परंतु त्या बॅटरी चोरीनंतर हॉस्पिटलवर मोठे संकट उभे राहिले होते. कारण आय सी यु आणि एन आय सी यु मद्ये जवळपास 69 लहान बालकाचा जीव धोक्यात आला होता.
त्या आलेल्या मोठ्या संकटावर डॉ शितल शहा याने आपल्या चाणक्य बुध्दीने लगेच पर्याय व्यवस्थेचे सोय करून आय सी यु आणि एन आय सी यु मध्ये असलेल्या लहान बालकांचा धोका टाळला आणि 69 बालकांचा जीवन बचावल्या अशा नवजात बालकांना जीवनदान दिलेली डाॅक्टरची आमदार समाधान आवताडे यांनी भेट देऊन त्या गोष्टीची चौकशी करून बालकाचे जीव वाचवल्याबद्दल त्याचे कौतुक ही केले.
तसेच डॉ शितल शहा यांच्या बरोबर हॉस्पिटलची पहाणी करून विविध समस्यावर चर्चा करण्यात आली व हॉस्पिटलला लागणारी विविध प्रकारच्या यंत्रसामग्रीच्या रूपाने मदत करण्याचे आव्हान केले व डॉ शितल शहा यांच्या आजपर्यंतच्या सेवेचे आमदार महोदय यांनी त्यांचे तोंड भरुन कौतुक केले.
डॉ. शितल शहा यांनी अतिदक्षता घेऊन लहान बालकाचा जीव वाचवल्याबद्दल आमदार आवताडे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. सदर प्रसंगी विनोदराज लटके, राहुल गावडे, बंटी भोसले, अमोल धोत्रे, पांडुरंग करकमकर, अविनाश मोरे, पंढरपूर विभागाचे स्वीय सहाय्यक बालम मुलाणी, नवनाथ शिंदे, अभिजीत मोरे, हॉस्पिटल मधील डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा