जनतेच्या धोरणात्मक विकासाला चालना देण्यासाठी कार्यकर्तव्याला गती द्या - आ. समाधान आवताडे
शिवशाही वृत्तसेवा ,पंढरपूर
मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रातील धोरणात्मक विकासासाठी शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांनी जनतेला केंद्रस्थानी ठेवून आपल्या कार्यकर्तव्याला गती द्यावी अशा सूचना पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी तालुक्यातील अधिकारी व पदाधिकारी यांना दिल्या आहेत. मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या मूलभूत आणि पायाभूत समस्या जाणून त्याचा निपटारा करण्यासाठी आ. समाधान आवताडे यांनी तालुकास्तरीय सर्वच खात्यातील अधिकारी व पदाधिकारी यांना सोबत घेऊन मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील दौरा केला.
गावभेट दौरा कार्यक्रमाअंतर्गत आ. समाधान आवताडे यांनी दुसऱ्या टप्प्यातील गावभेट दौऱ्यानिमित्त हिवरगांव, खोमनाळ, जालीहाळ, हाजापूर, भाळवणी, सिद्धनकेरी, रड्डे, शिरनांदगी, मारोळी, महमदाबाद(हु), पडोळकरवाडी, लोणार या गावांना भेटी देऊन नागरिकांच्या विविध अडी - अडचणी व समस्या जाणून घेतल्या. तालुक्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच कटीबद्ध असून जनतेचा सर्वच पातळीवर धोरणात्मक विकास होण्यासाठी केवळ कागदी घोडे नाचवून नाहीतर प्रत्यक्ष कृती करून आपल्या कर्तव्याची कौशल्यता सिद्ध करा अशा सूचना आ. समाधान आवताडे यांनी दिल्या आहेत.
मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीज, रस्ते, आरोग्य आदी समस्या लवकरात - लवकर निकाली काढण्यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना द्यावी व सदर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नागरिकांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहनही आ. समाधान आवताडे यांनी केले आहे. या दौऱ्यादरम्यान वरील गावातील नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार महोदय यांना दिले. जनतेच्या या निवेदन अनुषंगाने आ. समाधान आवताडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या गावभेट दौऱ्यासाठी प्रा येताळा भगत, माजी सभापती प्रदीप खांडेकर, दामाजी शुगर संचालक राजेंद्र सुरवसे, राजीव बाबर, सचिन शिवशरण, बसवराज पाटील, सुनिल लोखंडे, सुरेश कांबळे, पोलीस निरीक्षक रणजित माने, बांधकाम विभाग चे शैलेश गुंड, आरोग्य विभाग डॉ पुनम दुधाळ, गटविकास अधिकारी श्रीमती सुप्रिया चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल, गौडाप्पा बिराजदार, नाथाजी काशीद, मुदरेड्डी, आप्पा राऊत, एकनाथ होळकर, रंगनाथ कलुबर्मे, उत्तम लंगडे, रविकुमार शिंदे, वसंत बिले, विठ्ठल पडोळकर, बाळासाहेब घुमरे, यशवंत खताळ, प्रविण चव्हाण, डॉ माने, मधुकर सोनलकर, सचिन जोग, धनंजय पाटील, दत्तात्रय नवत्रे, युवराज शिंदे, दिगंबर यादव, सुशांत हजारे, अविनाश मोरे, बालम मुलाणी, रवी खांडेकर, सचिन सोमुत्ते आदी मान्यवर, सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी तसेच विविध खात्याचे शासकीय अधिकारी व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा