राजमुद्रा प्रतिष्ठान चा मानवतावादी उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, टेंभुर्णी (प्रतिनिधी - नवनाथ नांगरे)
टेंभुर्णीजवळ असलेल्या मौजे चव्हाणवाडी गावामधील नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राजमुद्रा प्रतिष्ठान च्या वतीने धर्मवीर छञपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी चव्हाणवाडी गावचे सरपंच सुनील बापू मिस्कीन, ग्रा. पं. सदस्य हनुमंत अण्णा चव्हाण , ॲड. सचिन चव्हाण, ग्रा. पं. सदस्य नवनाथ शिंदे, सुभास बापू इंदलकर, संजय काका मिस्कीनअर्जुन अण्णा सलगर,कैलास चव्हाण साहेब, हॉटेल शिवशंकर चे मालक बाळासाहेब चव्हाण, ॲड. महेश खरात , रोहन चव्हाण , सुरज देशमुख, सुदर्शन डांगे सह बहुतांश ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवशाही न्यूज चॅनल सबस्क्राईब करा -
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजीराजे यांच्या प्रतिमांचे विधीवत पूजन करण्यात आले. तदनंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे सर्वच मान्यवरांचा आणि रक्तदात्यांचा सन्मान गुलाब पुष्प आणि छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, यांचे जीवन चरित्र ग्रंथ भेट देऊन करण्यात आला.
यावेळी शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक अकलूज यांच्या संपूर्ण टीमचा ही यथोचित गौरव करण्यात आला. जवळपास 50 हून अधिक रक्तदात्यांनी अगदी दिलखुलासपणे रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ नांगरे सर यांनी केले तर आभार प्रा.मनोज नांगरे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर नांगरे, शशिकांत नांगरे, प्रवीण नांगरे, मंगेश इंदलकर, नितीन नांगरे,निलेश पवार, संजय जगताप,तुषार (पप्पू) नांगरे, राजकुमार नांगरे, ज्योतीराम गोफणे,अविनाश नांगरे, विनोद नागरे, विजय नांगरे, रामचंद्र नांगरे, नागेश नांगरे, वैभव नांगरे, औदुंबर नांगरे, दत्तात्रय नागणे, विशाल भोसले, बाळासाहेब नांगरे, समाधान नांगरे, दत्तात्रय गायकवाड सचिन नांगरे, सागर चव्हाण,स्वप्निल नांगरे, अक्षय नांगरे, स्वप्नील भांगे, अनिकेत रायचुरे, राहुल जाधव ,संकेत रायचुरे, विष्णू महालिंगडे आदी राजमुद्रा प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा