रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी अभिजीत पाटील यांनी दिला १लाख ५१हजार रू मदतीचा हात
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर तालुक्याचे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लेखक दिग्दर्शक निर्माते महिंद्र वसंतराव महाडिक लिखीत शिवपुत्र संभाजी महाराज या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख भूमिकेतून साकारण्यात येत असलेल्या या महानाट्याचा पाचवा दिवसाचे खा.छत्रपती संभाजी राजे यांच्या शुभहस्ते या प्रयोगाचे उद्घाटन झाले असून यावेळी माजी मंत्री दिलीप सोपल, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, माढा तालुक्याचे नेते शिवाजीराजे कांबळे, सोलापूर जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक(CP) हरिषजी बैजल, पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते मॅडम, पोलीस उपअधीक्षक विक्रमजी कदम, उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन वसंत नागदे, विरोधी पक्ष नेता नागेशजी अक्कलकोटे, जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख, संचालक सुर्यकांत बागल, तसेच आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन अभिजीतजी पाटील यांनी केले आहे ते कौतुकास्पद आहे. अभिजीत पाटील हे अतिशय धाडसी व कार्यक्षम,नेतृत्व आहेत, त्यांच्या रूपाने एक मोठ्या मनाचा व सुसंकृत नेता सोलापूर जिल्ह्याला मिळाला आहे. महानाट्याचा इतका भव्यदिव्य कार्यक्रम सलग मोफत दाखवण्यासाठी मोठ मन लागत, ते मन अभिजीत पाटील यांच्याकडे आहे. मी सदैव अभिजीत पाटील यांच्या सोबत आहे. असे वक्तव्य युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी केले.
अभिजीत पाटलांनी हे सहकार क्षेत्रात आदर्श कामगिरी करत सामाजिक बांधिलकीतून आपले आधी दाखवतात आणि त्याचं काम बोलतंय असे अभिजीत पाटलांना असेच मोठ्या मानाने व धाडसाने काम करतांना मी पाहिलं आहे असे वक्तव्य माजी मंत्री दिलीप सोपल यांनी केले. यावेळी पंढरपूर, सोलापूरच नव्हे तर संपूर्ण राज्यातून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर हजारोंच्या संखेने शिवप्रेमी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा