माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्यावरून सर्व परिचारक विरोधकांची एकजूट
शिवशाही विशेष
पंढरपूर नगर परिषदेमध्ये काही अपवाद वगळता, अनेक वर्षे एक हाती सत्ता असलेल्या, परिचारक यांना, आज विरोधकांनी काढलेल्या मोर्चाने, घाम फोडला आहे. अशी कुजबूज पंढरपुरात सुरू झाली आहे. नगरपरिषदेत अनेक वर्ष परिचारकांची एक हाती सत्ता आहे. त्यांना सत्तेतून पायउतार करण्याचे, अनेक नेत्यांनी, अनेकदा प्रयत्न केले आहेत. परंतु काही अपवाद वगळता, विरोधकांना त्यात यश आलेले नाही. आता नगरपरिषदेची निवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीत काहीही करून, परिचारिकांना धक्का द्यायचाच, या हेतूने, सर्वच विरोधी पक्ष आणि संघटना, गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करत आहेत. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी, गेल्या काही महिन्यांपासून, नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने तयारी चालवली आहे. परिचारकांच्या विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु काँग्रेसने दिलेला स्वबळाचा नारा, राष्ट्रवादीतील गटबाजी, यामुळे धोत्रे यांच्या प्रयत्नांना कितपत यश मिळेल? याबाबत साशंकता होती.
मात्र माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या, पुतळ्याच्या निमित्ताने, आज विखुरलेले विरोधक एकजूट झालेले दिसले. त्यामुळे येणारी पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक, रंगतदार होणार हे तर उघडच आहे. पण आजच्या मोर्चात दिसलेली विरोधकांची एकजूट, निवडणुकीपर्यंत कायम राहिली, तर पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत, सत्ताधारी परिचारिकांचा घाम काढणार, अशी कुजबुज मोर्चानंतर नागरिक करत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा