रोपळे येथील नेते, ग्रामपंचायत सदस्य व मित्र परिवाराकडून हर्षल कदम यांचे अभिनंदन
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
रोपळे येथील युवा नेते हर्षल कदम यांची पंढरपूर तालुका भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे
एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पंढरपूर तालुक्यात सध्या भाजपाची ताकत वाढत आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वात अनेक सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर तालुक्यात सध्या भाजपाची सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे हे आमदार झाले आहेत. एकंदरीतच सध्या तरुणांचा भाजपकडे ओढा असल्याचे दिसून येते.
पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात रोपळे गावचे स्थान महत्त्वाचे आहे आजपर्यंत अनेक नेतृत्व या गावाने तालुक्याला दिले आहेत. आताही गावात ग्रामपंचायतीमध्ये बहुसंख्य तरुण गावाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
रोपळे येथील युवा नेते हर्षल कदम हे गेल्या काही वर्षापासून राजकारणात सक्रिय झाले असून परिचारक गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत याच निष्ठेचे फळ त्यांना मिळाले असून त्यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
माजी आमदार प्रशांत परिचारक, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, भाजपा नेते सोमनाथ अवताडे, भाजपा पंढरपूर तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे यांच्या उपस्थितीत हर्षल कदम यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी हर्षल कदम यांची निवड झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच रोपळे येथील नेते, ग्रामपंचायत सदस्य व मित्र परिवाराकडून हर्षल कदम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
#bhartiy_janata_party #BJP #pandharpur
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा