रशिया आणि युक्रेन मधील युद्धामुळे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न
चार केंद्रीय मंत्र्यांना विशेष दूत म्हणून दिली आहे मोहीम
शिवशाही न्यूज विशेष
रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) पेटलेल्या युद्धामुळे (war), युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेले, अनेक विद्यार्थी तिथे अडकून पडले होते. या सर्व विद्यार्थ्यांना तिथून मायदेशी परत आणण्यासाठी, भारत सरकारने (government of India) चार केंद्रीय मंत्र्यांना विशेष राजदूत म्हणून, युक्रेन च्या शेजारील राष्ट्रांमध्ये पाठवले आहे. युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना, रोमानिया, पोलंड, हंगेरी, (Romania, Poland, Hungary) इत्यादी देशांच्या सीमेवर आणून, तेथून विमानाद्वारे भारतात आणण्याची योजना, भारत सरकार ने बनवली आहे. त्यानुसार आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र (Prime Minister Narendra Modi) मोदी यांनी, चार केंद्रीय मंत्र्यांना, खास या कामासाठी युक्रेन च्या मोहिमेवर पाठवले आहे. त्यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia), हरदीपसिंग पुरी (Hardipsingh Puri), किरण रिजिजू ( Kiran Rijiju), आणि व्ही.के. सिंग ( and V.K. sinh), यांच्यावर ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
या मोहिमेदरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे हे, रोमानिया येथे विशेष दूत म्हणून, काम करत आहेत. तेथील भारतीय विद्यार्थ्यांना भेटत आहेत. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानिया मध्ये दाखल झाले आणि त्यांनी तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली .
रशियाच्या हल्ल्यामळे युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये, महाराष्ट्रातील (maharashtra) ही अनेक विद्यार्थी आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे, तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना, तेथील मराठी विद्यार्थ्यांशी, त्यांनी मराठीतून (marathi) संवाद साधला. ते मूळचे महाराष्ट्रातील असल्यामुळे, त्यांनी महाराष्ट्रातील मुलांशी आपले मराठी नाते जपत, मराठीत संवाद साधला. महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना त्यांनी, त्यांचे नाव ,गाव, आई वडील काय करतात?, त्यांच्याशी तुमचा संपर्क झाला का?, तसेच तुमची इथे राहण्या-जेवणाची व्यवस्था नीट होते का?, असे प्रश्न विचारून त्यांना धीर दिला.
सांगलीच्या आणि पुण्याच्या विद्यार्थिनीशी बोलताना त्यांनी, "काळजी करू नका, काहीही गरज पडल्यास तातडीने सांगा. स्वतःची काळजी घ्या." असे सुचवले. इतकेच नाही तर त्यांना धीर देताना म्हणाले की, "घरच्यांना सांगा, काळजीचं कारण नाही, येथे मराठा आलाय ."
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आश्वासक बोलण्यामुळे, आणि विद्यार्थ्यांची भेट घेतल्यामुळे, तेथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना, धीर आला आहेच, पण त्यांनी मराठी विद्यार्थ्यांशी मराठीतून संवाद समजल्यामुळे, महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी विशेष जवळीक निर्माण झाली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा