गरीब,पण दानशूर माणसाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे
आधुनिकतेच्या आणि तंत्रज्ञानाच्या जगात श्रीमंतीच्या परिभाषा बदलल्या जात आहेत. आज ज्यांच्या जवळ जास्त पैसे, त्याला श्रीमंत समजले जाते. भले त्या व्यक्तीकडे कणभर सुद्धा माणुसकी नसेल. परंतु आजही माणुसकी आणि दातृत्व जगात शिल्लक आहे याची काही माणसं जाणीव करून देतात. या व्हिडिओमध्ये एक फाटक्या कपड्यातला, भिकाऱ्या सारखा दिसणारा माणूस, सायकलवरून गरमागरम अन्न, खास भटक्या कुत्र्यांसाठी देत असल्याचे दिसते. हा व्हिडीओ इंस्टाग्राम वर प्रचंड व्हायरल झाला आहे. स्वतःच्या अन्नाची भ्रांत असतानाही, मुक्या प्राण्यांना, गरम ताजे अन्न देणाऱ्या, या व्यक्तीच्या व्हिडिओवर, लाईक्सचा वर्षाव होत आहे. एका युजरने त्याला "जगातील सर्वात श्रीमंत माणूस" अशी कमेंट केली आहे. खरंच हा फाटका माणूस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. आपल्याला काय वाटते ?
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा