maharashtra day, workers day, shivshahi news,

आमदार रोहित पवार करणार पंढरपूर सह पाच मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षसंघटन

खासदार शरद पवारांच्या सुचनेनुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर दिली मोठी जबाबदारी

NCP, mp sharad pawar,minister jayant patil, mla rohit pawar,  shivshahi news,

पंढरपूर, करमाळा, श्रीगोंदा, उस्मानाबाद आणि भूम-परांडा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याची जबाबदारी

पंढरपूर ( pandharpur ) मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP ) पक्ष वाढीची जबाबदारी पक्षाने आमदार रोहित पवार ( MLA rohit pawar ) यांच्यावर सोपवली आहे. कर्जत जामखेड चे  ( karjat - jamkhed ) आमदार रोहित पवार, यांना मंत्रीपद ( minister ) मिळणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसात सातत्याने सुरू होती. परंतु मंत्रीपद देण्यापूर्वी पक्षाने आमदार रोहित पवार यांच्यावर, पक्षवाढीसाठी मोठी जबाबदारी टाकली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, खासदार शरद पवार, ( sharad pawar ) यांच्या सूचनेनुसार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील ( jayant patil ) यांनी, आमदार रोहित पवार यांच्यावर, ही जबाबदारी सोपवली असल्याचे, स्वतः आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.


भूम ( bhum - paranda ) परांडा, उस्मानाबाद ( osmanabad ), करमाळा ( karmala ), श्रीगोंदा ( shrigonda ), आणि पंढरपूर, या पाच विधानसभा मतदारसंघाचा, आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्षेत्रामध्ये समावेश असणार आहे. या पाच विधानसभा मतदारसंघात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढ करून, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना पक्षाकडे आकर्षित करण्याची जबाबदारी, आमदार रोहित पवार यांच्यावर असणार आहे.

आपल्यावर सोपवलेली जबाबदारी, आपण नव्या जुन्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, आणि जनतेमध्ये विश्वास संपादन करून, या पाचही मतदारसंघात पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे, आमदार रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

लवकरच नगरपरिषद ( nagar parishad ), पंचायत समिती ( panchayat samiti ), जिल्हा परिषद ( ZP ), सहकारी साखर कारखाने ( sugar factory ), बँका ( bank ), इत्यादींच्या निवडणुका (Elections) तालुक्यात होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार, यांच्यावर पक्षसंघटन मजबूत करण्याची, दिलेली जबाबदारी , पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीतील मतभेद दूर करून, येत्या निवडणुकांमध्ये, राष्ट्रवादीला यश मिळवून देईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे .

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी, आमदार रोहित पवार यांनी झंझावाती दौरे केले होते. यादरम्यान त्यांना, तालुक्यातील राजकारणाचा, बऱ्यापैकी अंदाज आला आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची, विस्कटलेली घडी बसवण्यात, आमदार रोहित पवार यशस्वी ठरतील, अशी आशा करायला हरकत नाही. ( Nationalist Congress Party )

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !