अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या आहे आपली आई ऐश्वर्या रायची कार्बन कॉपी
प्रजासत्ताक दिनी आराध्याने केलेल्या परफॉर्मन्स पाहून लोक म्हणाले अरे! ही तर लहानपणीची ऐश्वर्या राय
ऐश्वर्या राय बच्चन ( Aishwarya Rai Bachchan ) ही आपल्या सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तिचे करोडो चाहते जगभर आहेत. ऐश्वर्या रायने महानायक अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांचा मुलगा, अभिनेता अभिषेक बच्चन ( abhishek bachchan ) याच्याशी लग्न केल्यानंतर, चित्रपट सृष्टी पासून दूर राहणेच पसंत केले आहे. तरीही तिच्या प्रसिद्धीत तसूभरही फरक पडला नाही.
आराध्या ( Aaradhya Rai Bachchan ) ही अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची कन्या. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या रायने, आपले सारे लक्ष तिच्या मुलीच्या, आराध्याच्या संगोपनावरच केंद्रित केले आहे. मात्र ऐश्वर्या राय आराध्यासोबत सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींचाही सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोईंग आहे.
नुकताच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आराध्या बच्चन हिने एक स्टेज परफॉर्मन्स केला. तिच्या इतर फोटो आणि व्हिडिओ प्रमाणेच या व्हिडीओला देखील चाहत्यांनी पसंती दिली आहे. या व्हिडिओमध्ये आराध्या, पांढरा कुर्ता परिधान केली आहे. आणि मागे तिरंगा लहरत आहे. हा परफॉर्मन्स पाहून आराध्या बच्चन ही ऐश्वर्या राय बच्चनची कार्बन कॉपीच वाटत आहे. तिला पाहून लोकांना, ती लहानपणीची ऐश्वर्याच आहे, असे वाटते. कारण ती हुबेहूब ऐश्वर्या राय सारखीच दिसते. या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दिली असून, व्हिडिओ व्हायरल होत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा