सरकारी अनास्था लाडावून वीर मातेनेच बनवले आपल्या शहीद मुलाचे स्मारक
घरातील तरुण मुलगा गेल्यावर आईवडीलांवर दु:खाचा डोंगर कोसळतो. मात्र तो तरुण जर मातृभूमीच्या रक्षणासाठी शहिद झाला असेल तर दुःखामध्ये सुद्धा एक अभिमानाची किनार असते. अशावेळी देशासाठी सर्वश्रेष्ठ बलिदान देणाऱ्या जवानाच्या परिवाराकडे सर्वजण अभिमानाने पाहतात , सर्वत्र त्या परिवाराला सन्मान मिळतो.
छत्तीसगड पोलिस दलातील जवान बशील टोप्पो हे पेरवाआरा गावचे रहिवाशी. २०११ साली नक्षल कारवाईत त्यांना विरमरण आले. सरकारने त्यांचे गावात स्मारक बनवण्याचे वचन दिले होते. मात्र दोन वर्षाचा काळ गेला, तरी सरकारने स्मारक केले नाही. ही गोष्ट बशीलच्या आईला खपच लागली, आणि या वीरमातेने आपल्या शहिद मुलाचे स्मारक बनवण्या ठरवले. स्वत: जवळचे पैसे खर्च करून तीने स्मारक उभं करायला सुरुवात केली. त्यावेळी गाववाले ही पुढे आले, आणि जमेल तशी मदत करून या गावाने आपल्या शाहिद पुत्राचे स्मारक उभे केले.
शहिद बशील याची आई रोज येथे स्वच्छता आणि दिवाबत्ती करून आपल्या शहिद पुत्राच्या आठवणी ताज्या ठेवत आहे. तर गावकरी सुद्धा नियमित या स्मारकात येवून आपल्या गावचा अभिमान असलेल्या वीरपुत्राला मानवंदना देतात. तसेच स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला इथे ध्वजारोहण करण्यात येते. सरकारी अनास्थेमुळे शौर्याची होत असलेली, अवहेलना डावलून या गावाने आणि शहिद बशील टोप्पो यांच्या वीरमातेने जे काम केले आहे, ते संपूर्ण देशासाठी प्रेरणा देणारे ठरले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा