maharashtra day, workers day, shivshahi news,

अखिल भारतीय ओबीसी भटके विमुक्त फेडरेशनची पुण्यात स्थापना

तुम्ही कोणत्याही संघटनेचे व पक्षाचे काम करा मात्र ओबीसी शिखर संस्थेच्या छायेत एकत्र आले तरच आपले प्रश्न सुटतील-हरिभाऊ राठोड 

All India OBC Bhatke Vimukta Federation , pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा पुणे

राष्ट्रीय ओबीसी महासंघ पुरस्कृत अखिल भारतीय ओबीसी भटके विमुक्त फेडरेशनची पहिली जनरल सभा दि.13 फेब्रुवारी 22 रोजी दुपारी 4 वाजता उद्यान प्रसाद कार्यलयात सम्पन्न झाली.यावेळी अध्यक्ष म्हणून माजी खासदार ,आमदार हरिभाऊ राठोड,राष्ट्रीय मुस्लिम ओबीसी चे अध्यक्ष शब्बीर अन्सारी,ऍड. राजन दीक्षित,कर्मवीर डॉ.प्रल्हाद वडगांवकर, ओबीसी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व फेडरेशन सरचिटणीस डॉ.पोपट कुंभार,सचिव नंदकुमार गोसावी,सौ.पुष्पा कनोजिया,सौ.किरण शिंदे, सुभाष मुळे मंचावर तर प्राचार्य डॉ.व्यंकटेश बांगवाड, डॉ.आर.एस. हिंगोले,विठ्ठल सातव,हनुमंत गायकवाड,उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला भारतीय घटनेची उद्देशिका प्रतिमाच मान्यवरांचे हस्ते पूजन करून सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे मागे सर्वांनी उद्देशिका आणि सत्याचा अखंड म्हंटले त्यानंतर नुकतेच लता दीदी,शिंदूताई सपकाळ,रमेश देव,राहुल बजाज,आणि डॉ.वडगांवकर यांचे धाकटे बंधू जेष्ठ समाजसेवक विनायक वडगांवकर यांचे निधन झाल्याने प्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी फेडरेशन चे अध्यक्ष पद स्वीकारले नंतर हरिभाऊ राठोड म्हणाले की आपण कोणत्याही संस्था ,संघटनेचे तसेच कोणत्याही पक्षाचे काम करा मात्र ओबीसी च्या या राष्ट्रीय फेडरेशन च्या शिखर संस्था म्हणून या ठिकाणी एकत्र आले पाहिजे तरच आपल्या ओबीसी चे प्रश्न शासनाकडून व केंद्राकडून सोडवण्यासाठी न्यायिक भूमिका पार पाडता येईल.ओबीसी चे आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.ओबीसी जनगणना, स्वतंत्र आर्थिक बजेट,शैक्षणिक सवलती,ओबीसी आरक्षण असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी या फेडरेशन ची स्थापना केली आहे.कर्मवीर डॉ.वडगांवकर यांची खूप वर्षांपासून फेडरेशन स्थापन होऊन त्यामाद्यमातून सर्व संघटना एकत्र येऊन ओबीसी च्या शेवटच्या घटकांचा विचार करीत काम व्हावे ही अपेक्षा होती ती आज सफल झाली .विशेष म्हणजे संत गाडगेबाबा चे भजन चालू असताना त्यांना निरोप मिळाला की चिरंजीव निधन झाले तरी त्यांनी प्रबोधनाचे भजन चालू ठेवले त्याच पद्धतीने आज वडगांवकर यांचे धाकटे बंधू गेले त्यांचे कुटुंबीय अंत्यविधी साठी गेले पण ते मात्र ओबीसी च्या कार्यासाठी त्यांचे घरी सुकाणू समितीची मीटिंग आणि आता जनरल मीटिंग मध्ये आम्ही दिवसभर हा त्याग पहात आहे.त्यामुळे मी शेवटच्या क्षणापर्यंत ओबीसी व तस्तम लहान घटकाला न्याय मिळवण्यासाठी अन्सारी साहेब सारखे प्रयत्न करणार आहे.

यावेळी शब्बीर अन्सारी म्हणाले की ओबीसी मुस्लीम समाजासाठी व मंडल आयोग लागू होण्यासाठी आम्ही रात्रंदिवस झटलो ,त्यागमय जीवन जगलो त्यावेळी कुठे हातात थोडे यश प्राफ्त झाले ,अजून खूप लढाई बाकी असून घटनेच्या कलम 340,341,342 प्रमाणे सर्वाना समान न्याय मिळाला पाहिजे ,कोणत्याही घटकांवर अन्याय होता कामा नये यासाठी मोठी लढाई करावी लागणार असून प्रथम सर्व घटकांची जात वार जनगणना झाली पाहिजे प्राण्यांची व इतर गोष्टींची गणना होते तर ओबीसी का नाही होत. आतातर ओबीसी संख्या घटली असे आकडेवारी जाहीर करू लागलेत ,भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आणि ओबीसी घटते आहे हे नाटक थाम्बले पाहिजे त्यासाठी ओबीसी सर्व घटकांची जनगणना झालीच पाहिजे हा प्रथम अजेंडा घेऊन सर्वजण काम करू या तसेच ओबीसी आरक्षण वाचवू या ,कोणत्याही घटकांवर अन्याय होऊ नये असे विविध गोष्टी वर अनेक जणांनी मते मांडली.तर पुढील मीटिंग च्या वेळी 200,300 संघटना पदाधिकारी व इतर सोबत मोठा कार्यक्रम घेऊन एकच निर्धार करून लढा उभारत राज्यकर्ते बनू या असा संकल्प सर्वांनी केला तसेच या फेडरेशन छताखाली सर्वांनी एकत्र काम करणार असल्याचे सर्वांनी जाहीर केले.

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक उपाध्यक्ष ऍड राजन दीक्षित आणि कर्मवीर डॉ.प्रल्हाद वडगांवकर यांनी थोडक्यात फेडरेशन चे स्थापना ध्येय धोरणे सांगितले व सूत्रसंचालन सत्यशोधक रघुनाथ ढोक तर आभार प्रदर्शन प्रा.सुदाम धाडगे,आणि मोलाचे सहकार्य शेखर बामणे,मुख्याध्यापक दीपक महामुनी,आकाश ढोक, रमेश कुलकर्णी यांनी केले.शेवटी राष्ट्रीय गीत जण गण मन गाऊन सभेची सांगता केली.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !