शिवशाही वृत्तसेवा कोल्हापूर
भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. वारंवार येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी चा सामना करत, शेतकरी कायम ताठ उभा असतो. दुष्काळ आणि नापिकीचा वार झेलत असतो. तरीही शेतकरी कधी डगमगून जात नाही. आणि दरवर्षी नव्या जोमाने तो काळ्या आईची सेवा करतच राहतो. सरकारे मात्र शेतकऱ्यांकडे कायमच दुर्लक्ष करत आली आहेत. क्वचित कधीतरी मदत करून, शेतकऱ्यांचे दयनीय चित्र, आपली व्यवस्था निर्माण करत असते. मात्र शेतकरी कशातच कमी नाही, हे अधोरेखित करणारा एक व्हिडिओ, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोल्हापूरचे द्राक्ष बागायतदार राहुल सावंत हे गोल्डन शेतकरी म्हणून ओळखले जातात. आपला शेतीमाल थेट ग्राहकांना विकण्यासाठी, त्यांनी एक भन्नाट कल्पना लढवली आहे. त्यांनी कोल्हापुरात आलिशान अशा फॉर्च्युनर गाडी मध्ये, द्राक्षे विक्रीचा स्टॉल लावला आहे. हे पाहून लोक आचंबित झाले आहेत. इतकेच नाही तर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. शेतकरी सधन झाला पाहिजे, आणि समाजाने शेतकऱ्याला कमी लेखू नये, यासाठी आपण फॉर्च्यूनर गाडीतून द्राक्ष विक्रीचा स्टॉल लावल्याचे राहुल सावंत सांगतात.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा