पंढरीत कलेच्या सेवेसाठी रसिकराज दालनाचा शुभारंभ
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या समोरील ओंकार व्यापारी संकुल येथे रसिकराज दालन या छोटेखानी सभागृहाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या सौ. सविता रवि सोनार व सौ. शर्मिला मिलिंद देशपांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. चाळीस खुर्च्यांची क्षमता असलेल्या रसिकराज दालन मध्ये छोटेखानी स्वरुपातील कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, व्याख्यान, चित्र प्रदर्शन, गीत गायन, सत्कार समारंभ, विविध कार्यशाळा, लघुपट महोत्सव हे व असे उपक्रम करता येऊ शकणार आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या सौ. सविता रवि सोनार यांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने शुभारंभ करण्यात आलेल्या तसेच पंढरपूर परिसरातील वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण कलासाधकांसाच्या सेवेत लवकरच रुजू होणाऱ्या रसिकराज दालन शुभारंभ प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार, बालाजी डेव्हलपर्सचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मिलिंद देशपांडे, कृष्णराव केवटी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार सोनार, रशीद मुलाणी, गणेश गवळी आणि सतीश घोडके यांनी विशेष परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा