गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पंढरपुरात महापूजा महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपुरात संत गजानन महाराज मंदिरात, संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महापूजा, तसेच महाप्रसाद करण्यात आला. प्रकट दिनानिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. कोरोना नंतर मंदिर भाविकांसाठी खुले झाल्याने, भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांनी मंदिरात दर्शन घेऊन, महाप्रसादाचा लाभ घेतला. संत गजानन महाराजांचे शेगाव येथे समाधी मंदिर आहे. गजानन महाराज पंढरपुरची नियमित वारी करत असत. आजही आषाढी वारीला शेगाव वरून पंढरपूरला गजानन महाराजांची पालखी येते. पंढरपुरात गजानन महाराजांच्या भक्तांची संख्या मोठी आहे. मठा बरोबरच काही मंडळे आणि घरोघरी प्रकट दिनानिमित्त पूजाअर्चा व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा