maharashtra day, workers day, shivshahi news,

श्री माताजी निर्मला देवी प्राथमिक उच्च प्राथमिक प्रशालेत शालेय व्यवस्थापन समिती सभा उत्साहात

विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची गोडी लावण्यासाठी विविध उपक्रम

rukmini vidyapith, nirmaladevi school, pandharpur, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर

श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संचलित श्री माताजी निर्मला देवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यालय प्रशालेची पुनर्गठित शालेय व्यवस्थापन समितीची प्रथम सभा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी मा. सौ सूनेत्रा ताई विजयसिंह पवार होत्या. व्यवस्थापन समिती सदस्या सौ पूजा पतंगे यांनी लॉक डाउन काळात घेतलेल्या ऑनलाइन अभ्यासाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रशालेच्या व्यवस्थापनात व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात सर्व समिती सदस्य हिरीरीने सहभागी होतील असे उपाध्यक्षा सौ अनुराधा येळे यांनी सांगितले .

मा. अध्यक्षा सूनेत्रा ताई या परगावी असल्याने व्हिडिओ कॉल वर द्वारे पालकांशी संवाद साधला. मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सामाजिक अंतर पाळून विद्यार्थ्यांच्या मुक्त हालचाली घ्याव्यात, विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची गोडी लावण्यासाठी विविध उपक्रम सुरु करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी भोसले यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी उपाध्यक्षा सौ अनुराधा येळे ,सौ अश्विनी कांबळे ,सौ पूजा पतंगे ,सौ आशा लोंढे सौ सरोजा रणदिवे ,सौ वैशाली लिगाडे ,सौ मनीषा कदम ,सौ माधुरी पवार उपस्थित होत्या. सूत्रसंचालन श्री आलनदीप टापरे यांनी केले.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !