maharashtra day, workers day, shivshahi news,

श्री संत दामाजी महाविद्यालयात ५७१ विद्यार्थ्यांचे लसीकरण

15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे झाले कोरोना लसीकरण

Covid-19, corona vaccination, mangalwedha, sant damaji college, shivshahi news,

मंगळवेढा तालुका प्रतनिधी (राज सारवडे)

श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात  राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कनिष्ठ विभागातील १५ ते १८ वयोगटातील ५७१ विद्यार्थ्यांना कोवीड १९ प्रतिबंधात्मक पहिली लस देण्यात आली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या सौजन्याने आयोजित केलेल्या लसिकरण मोहिमेचे उदघाटन समन्वयक राहुल शहा,अरुणाताई माळी, किसन गवळी,अरुण किल्लेदार, चंद्रशेखर कौंडुभैरी,मुरलीधर दत्तू ,बजरंग ताड,प्रशांत यादव, राहुल ताड,बबलु सुतार,प्राचार्य डॉ एन बी पवार आदींच्या हस्ते करण्यात आले प्रथम तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे व वाढदिवसानिमित्त चंद्रशेखर कोंडुभैरी यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला विद्यार्थी हा केंद्रबिंदु आहे कोरानाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून तसेच १२ वी बोर्ड परीक्षा लक्षात घेता तब्बल ५७१ विद्यार्थ्यांना कोव्हॅकसीनची लस देऊन महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे तसेच काही कारणास्तव गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांचेही लवकरच लसीकरण करून घेण्यात येणार आहे त्याचबरोबर सदर लसीकरण मोहिमेत लस घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना २८ दिवसानंतर पुन्हा महाविद्यालयातच दुसरी लस देण्यात येणार आहे यावेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आरोग्य अधिकारी डॉ भाऊसाहेब जानकर डॉ बालाजी बचुटे डॉ सिद्धराया बिराजदार कांचन करे प्रदिप भोसले जयसिंग हेंबाडे दत्ता ढेकळे गुरूदेव चौगुले विजय बागल प्रल्हाद नाशिककर यांचे मोलाचे सहकार्य लाभले लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा धनाजी गवळी,यांचेसह कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !